नारायण राणे यांच्याकडून भाजपात प्रवेश करण्याचे संकेत

नारायण राणे यांनी आज कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला, त्यानंतर राणे यांनी हा निर्णय जाहीर केला

Updated: Sep 20, 2019, 12:16 AM IST
नारायण राणे यांच्याकडून भाजपात प्रवेश करण्याचे संकेत title=

सिंधुदूर्ग : नारायण राणे भाजपामध्ये पुढच्या आठ दिवसांत जाणार आहेत. नारायण राणे यांनी स्वतःच ही घोषणा केली आहे. नारायण राणे यांनी आज कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला, त्यानंतर राणे यांनी हा निर्णय जाहीर केला. 

युती होते की नाही, त्याच्याशी आपलं देणं घेणं नाही, मला मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे, असं नारायण राणे यावेळी म्हणाले. त्याचबरोबर नाणारबद्दलचं मत भाजपात गेल्यानंतर जाहीर करणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

नारायण राणे यांनी पहिल्यांदाच राज्यात जेव्हा युतीचं सरकार आलं, त्याकाळात शिवसेनेकडून मनोहर जोशी यांच्यानंतर मुख्यमंत्री पदभूषवलं. यानंतर नारायण राणे यांचे शिवसेनेत वाद झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. यानंतर नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 

काँग्रेसचे सरकार असताना महसूलमंत्री पद भूषवलं. यानंतर नारायण राणे हे काँग्रेसमधून बाहेर पडले, त्यांनी स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली. आता नारायण राणे यांनी भाजपात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत.