close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

पंतप्रधान मोदी म्हणाले, 'लेकीन शरद पवार? आप जैसा अनुभवी नेता जब...'

नाशिकच्या महाजनादेश यात्रेच्या समारोप सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनीही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर तोंडसुख घेतलं. 

Updated: Sep 19, 2019, 11:57 PM IST
पंतप्रधान मोदी म्हणाले, 'लेकीन शरद पवार? आप जैसा अनुभवी नेता जब...'

नाशिक : नाशिकच्या महाजनादेश यात्रेच्या समारोप सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनीही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर तोंडसुख घेतलं. मुख्यमंत्र्यांनी पवारांची मानसिकता राजेशाही असल्याची टीका केलीय. तर 'मतांसाठी पवारांची वक्तव्य दुर्देवी असतात, अशी टीका पंतप्रधानांनी पवारांवर केली. 

तर दुसरीकडे सरकारला  झोपेतही आपणच दिसतो असा टोला, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांनी लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मेळावा घेतला.