शहीद जवानाच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट, ना शासनाकडून मदत

काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात शहीद झालेले जवान यांच्या कुटुंबीयांना शासनाने जाहीर केलेली २५ लाखांची मदतही मिळालेली नाही. 

Updated: Jan 12, 2019, 07:44 PM IST
शहीद जवानाच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट, ना शासनाकडून मदत title=

नाशिक : काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात नाशिक जिल्ह्यातील जवान केशव सोमगीर गोसावी ऑक्टोबरमध्ये शहीद झाले होते. त्यांच्या अपंग वडिलांना केशवाच्या बँकेतील पैसे मिळाले नाही की लष्कराची मदतही अद्याप मिळाली नाही. त्यामुळे गोवावी कुटुंबीय आर्थिक संकटात असून हे कुटुंब हताश झाले आहे.  शासनाने जाहीर केलेली २५ लाखांची मदतही मिळालेली नाही. त्यामुळे पैसे नसल्याने खायचे काय, याच विवंचनेत गोसावी कुटुंबीयआहेत.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शिंदेवाडीच्या गोसावी कुटुंबीयांचा एकुलता मुलगा लान्सनायक केशव सोमगीर गोसावी देशासाठी दोन महिन्यांपूर्वी शहीद झाला. नौशेरा सेक्टरमधील गोळीबारात नाशिक जिल्ह्यातील हा जवान शहीद झाला. त्यावेळी त्यावेळी त्याची पत्नी आठ महिन्याची गरोदर होती. आता तिला मुलगी झाली आहे.  तर वडील अपंग आहे. अशी परिस्थिती असताना घरातील करता मुलगा जाऊन दोन महिने होऊनही अद्याप त्यांच्या लष्करी सेवेतील निवृत्तिवेतन मिळालेले नाही की त्यांच्या बँकेमधील पैसेही वडिलांना मिळालेले नाहीत. 

शासनाने जाहीर केलेले पंचवीस लाख रुपये अर्थसहाय्य मिळालेले नाही. तेरा दिवसांमध्ये अर्थसहाय्य केले जाईल तसेच शेतजमीन वारस म्हणून देण्याचे आश्वासन राज्य सरकारमार्फत करण्यात आले होते. मात्र यापैकी एकही आश्वासन अद्याप पूर्ण झाले नसल्याने कुटुंबाचे हाल होत आहे.