सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : राज्यातील सर्वात मोठ तारांगण आपल्या शहरात होतय याचा अभिमान वाटावा कि त्याची अवस्था दैयनिय झालीये याची लाज बाळगावी, असा प्रश्न नाशिककरांना पडलाय. कोरोनानंतर यशवंतराव चव्हाण तारांगण उघडण्याची नाशिककर नागरिक वाट पाहतायेत. अशात महापालिकेचं तारांगण हे धूळ खातच पडलं आहे.
देशासह राज्यातील परिस्थिती आता पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालय सुरु होतायेत. पण विज्ञान विषयक विशेषता अंतराळ विषयी माहिती देणारं हे तारांगण मात्र अजूनही बंद का आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. अंतराळ विषयी जाणून घेण्याची आवड असलेले विद्यार्थी आणि नागरिक, तारांगण कधी उघडणार याचीच वाट पाहत आहेत.
अंतराळ क्षेत्रात भारतीय विद्यार्थ्यांनी स्थान निर्माण करावं. विशेषतः उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा सहभाग मोलाचा ठरावा, यासाठी अंतराळ क्षेत्राची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी या हेतूने यशवंतराव चव्हाण तारांगणची निर्मिती महापालिकेने केली. मात्र कित्येक दिवसा पासून ते तारांगण धूळखातच पडून आहे. नाशिक पालिका 7 हजार 985 चौरस मीटर एवढ्या भल्यामोठ्या जागेत तारांगण प्रकल्प राबणारी ही देशातील पहिली महापालिका ठरली होती.
त्र्यंबक रोडवरील स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाजवळ 2007 मध्ये या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. मात्र, तारांगणाची सध्याची अवस्था पाहून विद्यार्थी आणि नागरिकांनी पालिका प्रशासानाला तारांगण लवकरात लवकर सुरू व्हावं अशी मागणी देखील केली आहे. हे तारांगण सुरू होण्यासाठी वर्क ऑर्डर निघण्याची वाट बघण्याशिवाय नाशिककरांकडे सध्या दुसरा पर्यायच उरला नाहीये.
मुंबईच्या धर्तीवर महापालिकेने उभारला तारांगणाचा प्रकल्प
नाशिक महापालिकेने मुंबईतल्या नेहरु तारांगणाप्रमाणेच मुंबईतल्या नेहरु तारांगणाप्रमाणेच साडे 6 कोटी खर्चून 2007 साली यशवंतराव चव्हाण तारांगण उभारलं. यादरम्यान तारांगणातील उपकरणं स्वदेशी की परदेशी असावी याबाबतदेखील बराच उहापोह झाला. या सर्व अडथळ्यानंतर अखेर एकदाच तारांगण सुरू झालं. हे तारांगण केवळ नाशिक शहरासाठीच नाही, तर उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी उपयोगी आहे.
कारण, या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रातील विज्ञानविषयक आणि तारे-ग्रह याबाबात जिज्ञासा असलेले नागरिक आणि विद्यार्थी ठिकाणी भेट देत असतात. पण आता कोरोना नंतरच्या काळातही तारांगण बंद असल्याने विज्ञान आणि अंतराळाबाबात आवड असलेले नागरिक उघडण्याची वाट पाहत आहेत.
...तर महापालिकेच्या उत्पन्न वाढीची शक्यता
महापालिका उत्पन्न वाढीसाठी विविध प्रकारे प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळतं. तारंगणाला भेट देण्यासाठी अनेक अभ्यासक येत असतात. याबरोबरच शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत अनेक शालेय विद्यार्थी देखील येथे येतात. जर तारांगण सुरू झालं तर महापालिकेच्या तिजोरीत नक्कीच वाढ होऊ शकते.