भुजबळांच्या घोषणेनंतरही नाशकात अनेक कुटुंब रेशनच्या प्रतिक्षेत

नाशिक जिल्ह्यातील ३० ते ४० टक्के रेशनिंगधारकांना रेशनिंग मिळालेलं नाही.

Updated: Nov 15, 2020, 11:17 PM IST
भुजबळांच्या घोषणेनंतरही नाशकात अनेक कुटुंब रेशनच्या प्रतिक्षेत title=

योगेश खरे, झी २४ तास नाशिक : सामान्यांची दिवाळी गोड करणार अशी घोषणा काही दिवसांपूर्वी अन्न व पुरवठामंत्री छगन भुजबळांनी केली. पण त्यांच्याच नाशिक जिल्ह्यातील ३० ते ४० टक्के रेशनिंगधारकांना रेशनिंग मिळालेलं नाही.

राज्यात सगळीकडं दिवाळीची धूम असली तरी नाशिकच्या या ज्योती पांढरे यांच्या घरात दिवाळीचा उत्साह नाही.. दिवाळीच्या तोंडावर त्यांना डाळ, साखर आणि गहू तांदूळ मिळालेलं नाहीत. ज्योती या एकट्या नाहीत, त्यांच्यासारख्या शेकडो रेशनिंग कार्डधारकांना रेशनिंगचं धान्य मिळालं नाही.

अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक जिल्ह्यात ३० ते ४० टक्के रेशनिंग कार्ड धारकांना स्वस्त धान्य मिळालं नसल्याचं सांगितलं जातंय. भुजबळ मात्र कुणालाही अन्नधान्य कमी पडणार नाही असं सांगतात.

रेशनिंगचं धान्य हे गोरगरीबांचा आधार आहे. दिवाळीतच हे धान्य मिळत नसल्यानं सामान्यांच्या घरी दिवाळीचा उत्साह नाहीय.