नाशिक : नाशिक जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी बांधवांनी आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढला होता. त्यातल्या नऊ पैकी नऊ मागण्या सरकारने मान्य केल्या होत्या. मात्र त्याची कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी झाली नसल्याने पुन्हा एकदा लाल वादळ आक्रमक झालेय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मागण्यांची पूर्तता सहा महिन्यांच्या आत केली जाईल असं आश्वासन दिलं होतं. मात्र मार्च ते जून असे तीन महीने पूर्ण झाले. तरी सरकार योग्य ती पाऊले उचलत नसल्याने आदीवासी शेतकऱ्यांनी सुरगाणा तहसील कार्यालयात धरणं आंदोलन सुरू केलंय. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत सुरगाणा तहसील कार्यालयाला घेराव घालून ठाण माडून राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
नाशिक जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी बांधवांनी आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी नाशिक ते मुंबई असा लोंग मार्च काढला होता. त्यातील जवळपास नऊ पैकी नऊ मागण्या सरकारने मान्य केल्या होत्या. परंतु त्याची कुठल्याही प्रकारची अम्मलबजावणी सुरू झाली नसल्याने पुन्हा एकदा लाल वादळ आक्रमक झालेय. सरकारने वन हक्काच्या दाव्यांची अमलबजावणी, रेशनकार्डची प्रकरणे, निराधार व वृद्धापकाळ पेन्शन योजनेची प्रकरणे यांना पाहिजे तशी अद्याप गती मिळाली नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मागण्यांची पूर्तता सहा महिन्यांच्या आत केली जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र मार्च ते जून असे तीन महीने पूर्ण झाले. तरी सरकार योग्य ती पाऊले उचलत नसल्याने लाल वादळाने सुरगाणा तहसील कार्यालयात धरणे आंदोलन सुरू केलेय. आदिवासी शेतकरी हे आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत सुरगाणा तहसील कार्यालयाला घेराव घालून ठाण माडून राहणार आहे.