नाशिकमध्ये कर्मचाऱ्याकडून मॅनेजरला मारहाण, कर्मचारी अटकेत

Updated: May 16, 2018, 08:12 PM IST

नाशिक : नाशिक शहरातील सातपूर औद्योगित वसाहतीत असलेल्य डायनामिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापक सचिन दळवी यांना कर्मचाऱ्याने मारहाण केलीय.

आधीच तोकडा पगार आणि त्यातच नोकरी जाण्याचं संकट अशा धास्तावलेल्या कर्मचाऱ्याला नोटीस बजावल्याने संतप्त होत कर्मचाऱ्याने कंपनीच्या टूलरुममध्येच मारहाण केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झालीय. 

या प्रकरणी कर्मचारी सुरेश चव्हाण याच्याविरोधात सातपूर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर अटक करण्यात आली.