नाशिकच्या तरुणाने बिल्डरच्या घरासमोरच संपवली जीवनयात्रा; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

Nashik Youth Suicide: नाशिकच्या तरुणाने बिल्डरच्या घरासमोर विष घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मृत तरुणाच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केले आहेत. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 24, 2023, 03:56 PM IST
नाशिकच्या तरुणाने बिल्डरच्या घरासमोरच संपवली जीवनयात्रा; कुटुंबीयांचा गंभीर आरोप title=
Nashik Youth Commit Suicide Infront Of Builder House

निलेश वाघ, झी मीडिया

Nashik Youth Suicide:  मालेगावमध्ये (Malegaon) युवकाने बिल्डरच्या घरासमोरच आत्महत्या (Suicide) केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विकास उशीरे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. उधारीचे पैसे न चुकवल्यामुळं विकासने टोकाचे पाऊल उचलले आहे. (Nashik Youth Suicide Infront Of Builder House)

मृत तरुणाच्या कुटुंबीयांचे घरासमोर आंदोलन

विकास हा बिल्डरला बांधकामाचे साहित्य पुरवत होता. बांधकाम सहित्याचे तब्बल 20 लाख रुपये बिल्डरने त्याला परत केले नव्हते. या नैराश्यातून बिल्डरच्या घरासमोरच विकासने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. विकासच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. कुटुंबीयांनी सामान्य रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहासमोरच ठिय्या आंदोलन करीत संशयित आरोपीला त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे. यामुळं परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान पालकमंत्री दादा भुसे यांनी आंदोलकांची भेट घेऊन समजून काढत पोलिसांना चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

विकासचे सदर बिल्डरला अनेक दिवसांपासून पैसे होते. वारंवार मागणी करूनही पैसे देत नसल्याने विकासने टोकाचे पाऊल उचलले आहे. विकासने विष प्राशन केल्यानंतर एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र काही अज्ञातांनी त्या ठिकाणचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोपही त्याच्या कुटुंबीयांकडून केला जात आहे.  या संपूर्ण प्रकाराची ही सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. 

नाशिकमध्ये महिलेवर अत्याचार

नाशिक रोड रेल्वे स्थानकावर 19 वर्षाच्या विवाहित तरुणीवर सामूहिक बलात्कार  करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. गुजरात मधील नवसारी येथून ही विवाहिता आपल्या बहिणीकडे आली होती. रेल्वेने मध्यरात्री ती रेल्वे स्थानकावरच थांबली होती. सकाळ झाल्यावर घरी जाण्यासाठी बस मिळतील म्हणून तिने रेल्वे स्थानकावर थांबण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याचवेळी मदतीच्या बहाण्याने विवाहितेला अज्ञात स्थळी नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. हा प्रकार समोर आल्यानंतर या दोघांना नाशिक रोड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ तपास करत आरोपींना अटक केली आहे. आरोपींपैकी एकजण रेल्वे स्थानकावरील पाणी विकण्याचे काम करतो तर दुसरा रिक्षाचालक आहे.