अश्विनीच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी नौदलाची मदत

अश्विनी बिद्रे खून प्रकरणी आता अश्विनीच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी नौदलाची मदत घेण्यात येणार आहे. मीरा - भाईंदरच्या खाडीत अश्विनीचा मृतदेह टाकण्यात आला होता.  यामुळे मृतदेहाचा अवशेषांचा शोध घेण्यात येणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 2, 2018, 06:26 PM IST
अश्विनीच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी नौदलाची मदत  title=

नवी मुंबई : अश्विनी बिद्रे खून प्रकरणी आता अश्विनीच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी नौदलाची मदत घेण्यात येणार आहे. मीरा - भाईंदरच्या खाडीत अश्विनीचा मृतदेह टाकण्यात आला होता.  यामुळे मृतदेहाचा अवशेषांचा शोध घेण्यात येणार आहे.

सोमवारी ही शोध मोहीम हाती घेण्यात येणार आहे. गुरुवारी न्यायालयात अश्विनी बिद्रेचा खून झाला असल्याचा खुलासा केला. तशी कबुली  अभय कुरुंदकर  याचा अटकेत असलेला चालक  कुंदन भांडारी आणि मित्र महेश फणीकर यांनी दिली. अश्विनीची हत्या करून तिचा मृतदेहाचे तुकडे करून ते दुसऱ्या दिवशी मीरा भाईंदरच्या खाडीत टाकण्यात आले.

यासाठी अभय कुरुंदकर याला राजू पाटील, कुंदन भांडारी आणि महेश याने वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली. हा तपास संगीत अल्फान्सो यांनी गतवर्षी केला होता पण तपास पूर्ण होता होता त्यांची बदली झाली होती. परंतु पुन्हा त्यांना घेतल्यानंतर या तपासाला वेग आलाय. आरोपीनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. परंतु या तपासाला उशीर झाल्याने तपासातील पुरावे नष्ट  होण्याची भीती अश्विनीचे पती राजू गोरे यांनी केली आहे.