NCP Ajit Pawar: विधानसभा निवडणूक तोंडावर असताना महायुतीत सारंकाही अलबेल नसल्याचे चित्र दिसतंय. राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बैठकीनंतर बाहेर येऊन उलटी होते, असे विधान शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांनी केले होते. यानंतर भाजप प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबतची युती दुर्देवी होती, हा असंगाशी संग असल्याची टीका केली. यामुळे महायुतीतील नेते, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरणं आहे. या सर्वावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लाडकी बहीणच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नागपुरात आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसमान यात्रा आज थेट काटोल विधानसभा मतदार संघात धडकणार आहे. माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी 2019 मध्ये काटोल मतदारसंघ राष्ट्रवादी करता जिंकला होता.
माझं बोलणं पंतप्रधान मोदी, केंद्रीय अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झाले आहे. तुम्ही जर असे बोलत बसलात तर माझे कार्यकर्तेदेखील प्रतिक्रिया देत राहतील. हाकेंच्या बोलण्याला काही अर्थ नाही. माझं माझं काम सुरु आहे. या उत्तरांना मी महत्व देत नाही, असे ते म्हणाले.
दुर्दैवाने अजित पवारांच्या गटाशी युती झालीय. आता भाजप आणि राष्ट्रवादीतील अजित पवार गटाशी युती म्हणजे असंगाशी संग, असा टोला गणेश हाकेंनी लगावलाय. अजित पवार गटाने युती धर्म पाळला का? भाजपच्या खासदाराला पाडल्याचाही आरोप हाकेंनी अजित पवार गटावर केलाय.यामुळे महायुतीच्या आमदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालंय. दुर्देवाने आमच्या सोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती आहे. ही युती ना आम्हाला पटली, ना आम्हाला पटली,असे ते म्हणाले. गणेश हाके हे भाजप प्रदेश प्रवक्ते असल्याने त्यांचे विधान गांभीर्याने घेतले जात आहे.
हे गणेश हाके यांचे वैयक्तिक मत आहे. त्यांना तिकिट हवं होतं. ते न मिळाल्याने हाके उद्वीग्न झाले असतील. गणेश हाकेंना विचारुन महायुती ठरली नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी दिली आहे. महायुतीचा धर्म पाळण्याची जबाबदारी एकट्या राष्ट्रवादीची नाही. विधानसभेला तिकिट न मिळाल्याने अशी वाचाळवीरासारखी वक्तव्ये करु नये, असे आवाहन त्यांनी हाकेंना केले. महायुतीमध्ये आम्ही काम करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जमिनीवर उतरुन काम करतोय. आम्हाला लोकांचा चांगला प्रतिसादही मिळतो. त्यामुळे यांच्या पोटात दुखतय. वरिष्ठ पातळीवर विधान होतील तेव्हा जशास तसं उत्तर दिली जातील. आपले आमदार आहेत तिथे भाजपला किती मतं मिळाली? याचे हाकेंनी आत्मचिंतन करावं. उगीच अशी विधाने करुन गोंधळ निर्माण करु नये असे सुरज चव्हाण म्हणाले.
मात्र राष्ट्रवादीतील फाटाफुटी नंतर ही जागा महाविकास आघाडीत पुन्हा एकदा अनिल देशमुख लढवतील अशी चिन्हं आहेत. तर महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या जागेसाठी आग्रही आहेत.. अजित पवार आज जनसमान यात्रेच्या निमित्ताने काटोल येथे कृषी उत्पन्न बाजार समिती महिला आणि शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. तसेच तिथे बाईक रॅलीत सहभागी होणार आहे..महत्त्वाचं म्हणजे नागपुरात दाखल झाल्यानंतर अजित पवार जिल्ह्यात फक्त काटोल येथेच जाणार आहेत.. त्यामुळे महायुतीमध्ये काटोलची जागा मिळावी याचे संकेतच अजित पवार यांनी दिलेय .. तर भाजपही या जागेसाठी आग्रही असून भाजपाचे अनेक नेते काटोल मधून लढण्यास इच्छुक आहे