मुंबई : 'माझी बहीण सुप्रिया सुळे ही राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री झाल्यास मला नक्की आवडेल', असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले आहे.
बीबीसी मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
भविष्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचे दावेदार कोण ? या प्रश्नाचे उत्तर देताना अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात निवड करताना कार्यकर्तेही द्विधा मनस्थितीत असतात.
या दोघांमध्ये डावं आणि उजवं कोण ? या मुद्द्याला घेऊन कार्यकर्त्यांमध्येही चर्चा रंगतात.
त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जाते. या दोघांमध्ये शीतयुद्ध असल्याचेही म्हटले जाते.
माझी बहीण राज्याची प्रमुख झालेली का नाही मला आवडणार?" पण सुप्रियाला राज्याच्या राजकारणात रस नाही. तिच संपूर्ण लक्ष दिल्लीच्या राजकारणात आहे, अशी पुष्टीही त्यांनी यावेळी जोडली.
जर सत्तेत आलो तर त्यावेळी महत्त्वाचा निर्णय हा आमदार आणि शरद पवार घेतील असेही त्यांनी 'बीबीसी'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.