औरंगाबाद : कर्जमाफी केली आणि लोकांनाच पैसे भरायला लावले ही कसली कर्जमाफी, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला विचारलाय.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लामोर्चा मोर्चाची सांगता औरंगाबादमध्ये झाली. यावेळी वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या मुद्यावरुनही सरकारला लक्ष्य केलंय.
याशिवाय धार्मिक दंगली, नोटाबंदीवरुनही सरकारवर हल्लाबोल केला. या मोर्चाला पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते. केंद्रीय अर्थसंकल्पात १० कोटी गरीब कुटुंबांना ५ लाखांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय.
याच मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सरकारला लक्ष्य केलंय. गाजरही म्हणतंय मला बाहेर नका काढू अशा शब्दांत त्यांनी शिवसेना-भाजपवर तोंडसुख घेतलंय.
तर सुप्रिया सुळे आणि धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय. केंद्र आणि राज्य सरकारने महापुरुषांच्या स्मारकांची घोषणा केली. मात्र कोणत्याही स्मारकाचं काम सुरु झालं नसल्याने मौन व्रत आंदोलनाची घोषणा सुप्रिया सुळे यांनी केलीय.