Rupali Chakankar On Supriya Sule: अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर राष्ट्रीय पातळीवरील नेते शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेत आहेत. अशातच काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (rahul gandhi) यांनी देखील राष्ट्रवादीच्या नेत्यांसह बैठक मांडली होती. त्यावेळचे काही फोटो समोर आले होते. या बैठकीत शरद पवार, सुप्रिया सुळे, जिंतेंद्र आव्हाड, सोनिया दुहान (Sonia Doohan) यांसह इतर बडे नेते उपस्थित होते. अशातच आता सध्या एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. त्यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ट्विट करत मोठं वक्तव्य केलंय.
रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या ट्विटरवर एक फोटो रिट्विट केलाय. त्यात सोनिया दुहान आणि राहुल गांधी हस्तांदोलन (Sonia Duhan and Rahul Gandhi shake hands) करताना दिसत आहेत. त्या फोटोमध्ये आणखी एक व्यक्ती दिसते. ती म्हणते सुप्रिया सुळे. रुपाली चाकणकर यांनी या फोटोवरून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर निशाणा साधला आहे. एका नेटकऱ्याने हा फोटो शेअर केला होता.
'या फोटोत एका नेत्याचा विनम्र भाव दिसतो पण फोटो झुम केल्यास एका नेत्याची प्रचंड असुरक्षितता देखील पाहायला मिळते. नवं नेतृत्व घडलं पाहिजे यासाठी आयुष्यभर झगडणारे साहेब कुठे आणि या कुठे', असं एका नेटकऱ्याने म्हटलं होतं. त्या ट्विटला रुपाली चाकणकर यांनी रिट्विट करत अनुभवाचे बोल मांडले आहेत. काही गोष्टी फोटोत कैद झाल्यानंतर जगासमोर येतात, असं रुपाली चाकणकर (Rupali Chakankar On Supriya Sule) म्हणतात. त्यावेळी त्यांनी अनुभवाचे बोल असा हॅशटॅग देखील वापरलाय.
काही गोष्टी फोटोत कैद झाल्यानंतर जगासमोर येतात.
# अनुभवाचे बोल https://t.co/0ZKWicW4jQ— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) July 9, 2023
दरम्यान, प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी अजित पवार यांची साथ दिल्याने आता सोनिया दुहान या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) नवी दिल्ली मध्यवर्ती कार्यालयाचा कार्यभार सांभाळणार आहेत. खुद्द शरद पवार यांनी याची घोषणा केली होती. रुपाली चाकणकर आणि सुप्रिया सुळे यांच्यात संघर्ष होता का? असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.