शंभरऐवजी पन्नास रुपये देईन सांगितल्याने पत्नीवर कुऱ्हाडीचे वार

रागाच्या भरात पत्नीवर कुऱ्हाडीचा वार 

Updated: Aug 18, 2020, 05:41 PM IST
शंभरऐवजी पन्नास रुपये देईन सांगितल्याने पत्नीवर कुऱ्हाडीचे वार  title=

निफाड : पतीने शंभर रुपये मागितले पण त्याऐवजी पत्नीने फक्त ५० रुपये देईल असे पत्नीने सांगितल्याने रागाच्या भरात पत्नीवर कुऱ्हाडीचा वार केल्याची धक्कादायक घटना निफाड येथे घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

निफाड येथील उगाव रोड नजीक असलेल्या बेघर वस्ती येथे पहाटे ६ वाजेदरम्यान ही घटना घडली संशयित आरोपी वसंत नामदेव पवार याला पत्नी द्वारकाबाई वसंत पवार (५६) हिने शंभर रुपये न देता फक्त ५० रुपये देईल असं सांगितले. याचा वसंत याला राग आला आणि त्याने लोखंडी कुऱ्हाडीने द्वारकाबाईच्या डाव्या कानावर घाव घातला.

यात तिचा तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर वसंत पवार हा संशयित आरोपी फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याबाबत मयत द्वारकाबाई यांचा मुलगा आनंद वसंत पवार याने निफाड पोलिसात फिर्याद दिली. 
 
पोलिसांनी संशयित आरोपी वसंत पवार याच्यावर भादवि कलम ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल दाखल करत पुढील तपास पोलीस करत आहेत.