Pune: ट्रॅफिक मध्ये अडकलेल्या प्रवाशांना कंटाळ येवू नये म्हणून रिक्षा चालकाने अशी आयडिया शोधलेय की...

Pune:  पुण्यात एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रिक्षाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. हा प्रवास सत्कारणी लागावा, यासाठी प्रशांत कांबळे या युवकाने रिक्षामध्ये वाचनालय सुरू केले आहे.

Updated: Apr 10, 2023, 12:10 AM IST
Pune: ट्रॅफिक मध्ये अडकलेल्या प्रवाशांना कंटाळ येवू नये म्हणून रिक्षा चालकाने अशी आयडिया शोधलेय की... title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात (Pune) सध्या एका रिक्षाची जोरदार चर्चा आहे. रस्त्यावर धावणारी ही साधीसुधी रिक्षा नाही तर ही आहे एक धावती लायब्ररी. प्रशांत कांबळे या तरुणानं त्याच्या रिक्षामध्ये लायब्ररी सुरू केली आहे. पुण्यात वाहतूक कोंडी नेहमीचीच. अशा वेळी रिक्षात बसलेल्यांना ही पुस्तकं वाचता येतात. 

रिक्षात बसलेल्यानं मोबाईलमध्ये वेळ घालवण्यापेक्षा पुस्तकं वाचावीत, अशी प्रशांत यांची इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी रिक्षात शंभरपेक्षा जास्त लेखकांची पुस्तकं रिक्षात ठेवली आहेत. प्रशांत यांचा हा उपक्रम पुणेकरांनाही आवडला आहे. पिंपळे निलखमध्ये राहणा-या प्रशांत कांबळे यांना वाचनाची आणि नाटकाची आवड आहे. कोरोना काळामध्ये त्यांनी रिक्षा व्यवसाय सुरू केला. जेव्हा रिक्षामध्ये प्रवासी नसतात तेव्हा रिक्षा स्टँडवर रिक्षामध्ये स्वतः कांबळे पुस्तक वाचत बसतात. पुणेकर वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झाले आहेत. वाहतूक कोंडीमुळे प्रवास कंटाळवाना होतो. अशावेळी प्रवाशांची चिडचिड होते. 

पुण्यात एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रिक्षाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. हा प्रवास सत्कारणी लागावा, यासाठी प्रशांत कांबळे या युवकाने रिक्षामध्ये वाचनालय सुरू केले आहे. पिंपळे निलख या ठिकाणी राहणारे प्रशांत कांबळे यांच्या रिक्षात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुस्तक रिक्षामध्ये उपलब्ध होतात. अनेक पुणेकर या रिक्षामध्ये बसतात. त्यावेळी ते मोबाईल बाजूला ठेवून पुस्तक वाचतात. पुस्तकांची आवड व वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून कांबळे यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे.  मी रिक्षा व्यवसाय जरी बंद केला तरी जो कोणी रिक्षा ड्रायव्हर असेल त्याला हा उपक्रम मी पुढे ठेवायला लावेल असे निखिल यांनी सांगितले.