मूळ आधार कार्ड नसल्याने २५ विद्यार्थ्यांना बाहेर काढले

ओरिजनल आधार कार्ड नाही असं कारण देत सीआयडी परीक्षेसाठी सांगलीला आलेल्या २५ परीक्षार्थी उमेदवारांना परीक्षेला बसू दिलं नाही.

Updated: Jan 27, 2018, 11:02 PM IST
मूळ आधार कार्ड नसल्याने २५ विद्यार्थ्यांना बाहेर काढले title=

सांगली : ओरिजनल आधार कार्ड नाही असं कारण देत सीआयडी परीक्षेसाठी सांगलीला आलेल्या २५ परीक्षार्थी उमेदवारांना परीक्षेला बसू दिलं नाही.

सकाळ सत्रात १७९ उमेदवार परीक्षेसाठी आले होते. त्यापैकी २५ उमेदवारांना बाहेर काढण्यात आलं.  सांगली जिल्ह्यातील बुधगांव येथील महाविद्यालयात सुरू असलेल्या परीक्षा केंद्रावर हा प्रकरा घडला. 

ओरिजनल आधार कार्ड प्राप्त झालं नसल्याने या विद्यार्थ्यांनी कलर झेरॉक्स आणलं होत, असं असूनही त्यांना परीक्षेला बसू दिलं नाही असा आरोप परीक्षार्थी विद्यार्थांनी केलाय.