Palghar Crime News : ना कोणती डिग्री, ना अनुभव तरी देखील तब्बल 26 वर्ष खुलेआम नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या बोगस डॉक्टरचा पर्दाफाश झाला आहे. पालघरच्या ग्रामीण भागात सध्या बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट सुरू आहे. पदवी नसताना देखील हे डॉक्टर खुलेआम उपचार करत नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असल्याच उघडकीस आल आहे.
मोखाडा पंचायत समिती लगतच मागील 26 वर्षापासून सुरू असलेल्या एका बोगस डॉक्टरच्या दवाखान्यावर कारवाई करण्यात आलेया. पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून या डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . आनंदा मलिक अस या बोगस डॉक्टरच नाव असून तो मागील 26 वर्षापासून या ठिकाणी पदवी नसताना देखील खुलेआम नागरिकांवर उपचार करत होता. त्यामुळे ग्रामीण भागात रुग्णांच्या आरोग्याशी केला जाणारा खेळ उघडकीस आला असून यानंतर मोखाडा पोलीस ठाण्यात फसवणूक व वैद्यकीय व्यवहार अधिनियम 1961 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . जिल्हा परिषदेने केलेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यात असलेल्या बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत .
मुंबईतही अशाच प्रकारे एका बोगस डॉक्टरव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी नसताना तो रुग्णांवर उपचार करत होता. मुंबईतील शिवाजीनगर, गोवंडी भागात त्यानं क्लिनिक थाटलं होतं. रुग्णांकडून तो भरमसाठ फी आकारत होता. मुंबईत पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट तीनने 4 बोगस डॉक्टरांना अटक केली होती. युनानी औषधांद्वारे उपचाराच्या नावाखाली त्यांनी लाखोंची फसवणूक केली होती. विशेष म्हणजे या चौघांपैकी एकाकडेही वैद्यकीय शाखेची पदवी नव्हती. त्यांच्याकडून वैद्यकीय उपकरणांसह, 14 लाखांची रोकड जप्त करण्यात आली.
मुंबईत नवजात बालकांची विक्री करणारी टोळी सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.अशाच एकाच टोळीचा ट्रॉम्बे पोलिसांनी पर्दाफाश केला होता. मुंबईच्या गोवंडी-शिवाजी नगर परिसरात अनधिकृतपणे नर्सिंग होम थाटून गर्भवतींना पैशांचं आमिष दाखवून बाळांची विक्री केली जात होती. याप्रकरणी पोलिसांनी सापळा रचून एजंट गोरीबी उस्मान शेख, बोगस डॉक्टर सायराबानो शेखशबाना झाकिर शेख, गुलाबशा मतीन शेख, ज्युलिया लॉरेन्स फर्नांडिस आणि रिना नितीन चव्हाण यांना पोलिसांनी अटक केलीय.