कोल्हापुरातील 109 गावं अंधारात, वीजपुरवठा सुरु करण्याचे प्रयत्न सुरु

कोल्हापुरात अजूनही अनेक गावात पुराचे पाणी.

Updated: Jul 24, 2021, 06:17 PM IST
कोल्हापुरातील 109 गावं अंधारात, वीजपुरवठा सुरु करण्याचे प्रयत्न सुरु

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि पुरस्थितीमुळे 109 गावांचा वीजपुरवठा पुर्णत: खंडित झाला आहे. तर 56 गावांचा अंशत: वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील 1 लाख 15 हजार 254 वीजग्राहकांच्या वीज पुरवठा खंडित झाला आहे. वीज पुरवठा सुरू करण्यासाठी वीज वितरण कंपनीचे प्रयत्न सुरु आहेत.

कोल्हापूर-सांगली मार्गावरील उदगावजवळ रस्त्यावर पाणी आला साठले आहे. थोड्याच वेळात सांगली कोल्हापूर मार्गही बंद होणार आहे. सध्या रस्त्यावर पाणी असतानाही जीव धोक्यात घालून वाहनचालक वाहन घेऊन जात आहेत.

शिवाजी पुलावर सुरू असलेल रेस्क्यू ऑपरेशन संपलं आहे. NDRF पथकाच्या वतीने काल पासून आंबेवाडी आणि चिखली गावामध्ये रेस्क्यू ऑपरेशन राबविल जात होतं. NDRF चे रेस्क्यू ऑपरेशन थांबल असल तरी अद्याप आंबेवाडी आणि चिखली गावात 100 हुन अधिक ग्रामस्थ आहेत. 

आम्ही सुरक्षित असल्यामुळे आम्ही बाहेर येणार नाही अशी पुरात असणाऱ्या ग्रामस्थाची अडमुठी भूमिका आहे. गरज लागल्यास पुन्हा रेस्क्यू ऑपरेशन राबवू असं NDRF ने म्हटलं आहे.

जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार NDRF टीम काम करेल. अशी माहिती NDRF टीम प्रमुख ब्रिजेश कुमार यांची झी मीडियाला दिली.