धुसफूस नाहीच, मुख्यमंत्र्यांनी केले अजित पवारांचे गोड कौतुक, म्हणाले...

राज्यातील महाविकास आघाडीत धुसफूस असल्याच्या चर्चाना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्णविराम दिलाय.  

Updated: Apr 2, 2022, 10:35 AM IST
धुसफूस नाहीच, मुख्यमंत्र्यांनी केले अजित पवारांचे गोड कौतुक, म्हणाले... title=

मुंबई : गेले काही दिवस राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये धुसफूस आहे. शिवसेनेचे मंत्री राष्ट्रवादीचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Home minister Dilip Valse Patil ) यांच्यावर राज आहेत. मुख्यमंत्री राष्ट्रवादी पक्षावर नाराज आहे अशा बातम्या सातत्याने चर्चेत येत होत्या. मात्र, या सर्व चर्चाना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief minister Uddhav Thackrey ) यांनी नववर्षादिनी पूर्णविराम दिलाय. 

वडाळा (Wadala ) येथे जीएसटी भवनाचे ( Gst House ) उदघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कोरोना काळात अडीच वर्ष आपण प्रत्यक्ष कामात कुठे दिसत नव्हतो पण होणाऱ्या कामाच्या पाठी होतो. आम्ही काम करत होतो. आज या वास्तूचे भमिपूजन करता असताना बदलत्या काळानुसार नवीन वस्तू कशी असावी याचे हे उत्तम उदाहरण आहे. अप्रतिम अशी ही वास्तू उभारली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या कामाचे श्रेय देईन. कारण, या वास्तूच्या निर्मितीचे आम्ही पहिल्या दिवसापासून जे एक स्वप्न पहात होतो. त्याची सुरवात अजितदादांनी केली. वेळोवेळो चर्चा करून ही वस्तू उभी राहील. आधीच्या सरकारमध्येही आम्ही होतो. पण, चर्चा किती वेळा झाली ते आठवत नाही. 

विकासकामांच्या श्रेयवादाची लढाई नाही. पण, ज्याने जे काम केले त्याची दखल घेतोच. सरकारमध्ये धुसफूस सुरु आहे असा अफवा उठल्या. पण तसे काही नाही. आमचं काही फाटलेलं नाही. आमच्या सरकारचे नावच महाविकास आघाडी सरकार आहे. ते फक्त नाव नाही तर प्रत्यक्ष जमिनीवरही आम्ही ते नाव अंमलात आणत आहोत. राज्यात विकासकामे करत आहोत. अखेरीस त्यांनी अजित पवार यांना उद्देशून अजित दादा जिथे तुम्ही आहेत तिथे मी येण्याचे काम उरत नाही असे सांगत त्यांच्यावरील विश्वास व्यक्त केला.