मंत्रीमंडळ विस्तारात पुण्याच्या हाती भोपळा

पुणे शहराला राज्याच्या मंत्रिमंडळात पुरतं डावल्यण्यात आलं आहे.

Updated: Jun 17, 2019, 08:31 PM IST
मंत्रीमंडळ विस्तारात पुण्याच्या हाती भोपळा title=

पुणे : लोकसभा, विधानसभेसह माहापालिकेच्या निवडणुकीत भाजपला भरभरून साथ दिलेल्या पुणे शहराला राज्याच्या मंत्रिमंडळात पुरतं डावल्यण्यात आलं आहे. शहरातून एकही मंत्री नसताना विधीमंडळात पुण्याचे प्रश्न कोण मांडणार असा प्रश्न पुणेकर विचारत आहेत.

शहरातले आठही आमदार भाजपचे असताना पुण्याची ही अवस्था आहे. कसब्याचे आमदार गिरिश बापट खासदार झाले, त्यामुळे त्यांच्याकडचं कॅबिनेट मंत्रीपद गेलं. कॅन्टोन्मेन्टचे आमदार दिलीप कांबळेंना डच्चू देण्यात आला. अशावेळी सलग दुसऱ्यांदा आमदारकी भूषवणाऱ्या पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ, खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर किंवा कोथरुडचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मेधा कुलकर्णी यांच्यापैकी किमान एकाची मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागेल अशी चर्चा होती. मात्र तसं घडलं नाही. 

पुणे जिल्ह्यातून मावळचे आमदार असलेल्या संजय उर्फ बाळा भेगडे यांना मंत्री मंडळात स्थान मिळालं. त्याविषयी आश्चर्य वाटण्याचं कारण नाही, पण पुण्याला का डावलण्यात आलं याबद्दल प्रश्न विचारले जात आहेत.