डेंग्यू, स्वाईन फ्लूमुळे नाशिकच्या सरकारी-खाजगी कार्यालयांना नोटीस

नाशिक शहरात डेंग्यू स्वाईन फ्लूच्या साथीनं थैमान घातलाय.

Updated: Sep 17, 2017, 11:24 PM IST
डेंग्यू, स्वाईन फ्लूमुळे नाशिकच्या सरकारी-खाजगी कार्यालयांना नोटीस title=

नाशिक : नाशिक शहरात डेंग्यू स्वाईन फ्लूच्या साथीनं थैमान घातलाय. त्यामुळे अस्वच्छता आणि डेंग्यू डासाच्या उत्पतीला कारणीभूत ठरणा-या एसटी महामंडळ, पंचवटी पोलीस  ठाणे, इंडिया सिक्युरीटी प्रेससह इतर सरकरी कार्यालायं आणि खाजगी संस्थांना नोटीसा पाठवून दंडात्मक कारवाईची कठोर पावलं उचलायला नाशिक महापालिका आरोग्य विभागानं सुरवात केलीय.

डेंग्यूला रोखण्यासाठी नाशिक महापालिका आरोग्य विभागानं मागील महिन्यात सर्वेक्षण केलं. त्यात काही सरकारी कार्यालयांचाही समावेश होता. सर्वेक्षणात ज्या भागात डासांच्या अळ्या आढळून आल्या. तिथल्या नागरिक आणि संस्थांना परिस्थितीत सुधारणा करण्याच्या सूचना आरोग्य विभागानं दिल्या होत्या. मात्र त्यात सुधारणा होत नसल्यानं आता नोटीसा पाठवण्यात आल्यात. मात्र या नोटीसीलाही केराची टोपली दाखवली गेली, तर आरोग्य विभाग संबंधितांवर दंड ठोठावणार आहे.