संभाजीनगर : एखाद्या सिनेमाला लाजवेल असंच काहीसं घडलं संभाजीनगरच्या आडुळ गावात. भरधाव तेलाचा टँकर पलटी झाला.. अन् उडाली झुंबड. पाहा नेमकं घडलं काय?
चचा आए मौसी आयी. आप भी दौडी चली आयी. सबको है एकदम घाई घाई. या रस्त्या बाजूला नेमकं घावलंय काय? कुणी तांब्या आणलाय, कुणी कळशी तर कुणी गाडीला बांधून आणलाय ड्राम. अरं सोन्याची खान घावली का काय? एकदम पळपळ.अरं कुणी सांगला का?
तर त्याचं झालं असं. गोडं तेलाचा टँकर सणकत चालला होता. संभाजी नगरातल्या आडूळ गावाजवळ डायव्हरचा ताबा सुटला. अन् टँकर झाला पलटी. जसा टँकर पलटी झाला तसं त्याल गळू लागलं. गावात खबर पोचली. तशी जनता तांब्या कळशी अन् डबा घेऊन हजर. अरं दाद्यानो हाटीलाचं मालक बी पोचलं एकमद ओक्के मधी.
व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा: https://youtu.be/P4v1bxs4vPA
फुकटात मिळतंय तेलं मग कशाला दौवडता वेळ असंच काय चित्र दिसायला लागलं. पण थोडं थांबा उगाच चारीतलं तेल घीव नका. त्यावर प्रक्रिया करायची हाय म्हण नाय तर जेवणात वापराल अन् थेट हॉस्पिटलात भरती व्हाल.