१ कोटी २६ हजार रूपयांच्या त्या जुन्या नोटा पुण्यातील कोणत्या बिल्डरच्या?

पुणे जिल्ह्यातील शिरूर पोलिसांनी कवठे येमाई इथे मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत १ कोटी २६ हजारांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत

Updated: Jun 12, 2019, 07:00 PM IST
१ कोटी २६ हजार रूपयांच्या त्या जुन्या नोटा पुण्यातील कोणत्या बिल्डरच्या? title=

हेमंत चापुडे, झी मीडिया, शिरूर-पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर पोलिसांनी कवठे येमाई इथे मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत १ कोटी २६ हजारांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी ८ जून रोजी रात्री गस्त घालत असताना ही कारवाई केली. हुंदाई कंपनीची कार क्रमांक MH12 EU 1194 च्या चालकाच्या संशयास्पद हालचाली होत्या. यानंतर शिरुर पोलिसांनी तपासणी केली आणि कारच्या सिटमध्ये जुन्या बंद झालेल्या ५०० आणि १ हजार रुपयाच्या नोटा आढळल्या.

या नोटा जुन्या चलनानुसार सुमारे १ कोटी २६ हजार रुपयांच्या आहेत. या नोटांबाबत विचारपुस केली, तर समाधानकारक उत्तरे पोलिसांना मिळाले नाही. याबाबतीत, गणेश शिवाजी कोळेकर वय २५ रा.सविंदणे, समाधान बाळू नरे, वय २१ रा. अहमदाबाद, अमोल देवराम दसगुडे वय २५ रा. कर्डीलवाडी, या ३ आरोपींविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

या नोटा पुण्यातील एका बड्या बिल्डरच्या असल्याची माहिती समोर येत आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक नारायण सांरगकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर पोलिस करत आहेत.