रक्षाबंधनाच्या दिवशी चार बहिणींचा जन्म

राणी राठोड या महिलेने रक्षाबंधनाच्या दिवशी चार मुलींना जन्म दिला.

Updated: Aug 27, 2018, 08:44 AM IST

यवतमाळ : यवतमाळच्या जिल्हा रुग्णालयात राणी राठोड या महिलेने रक्षाबंधनाच्या दिवशी चार मुलींना जन्म दिला. डॉक्टरांनी अत्यंत काळजीने शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती केली. दारव्हा तालुक्यातील चिखली येथील राणी यांना सोनोग्राफी तपासणीत ४ अपत्य असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी जिल्हा रुग्णालयात नियमित तपासणी सुरू ठेवली.

प्रकृती उत्तम

तिच्या प्रसूतीबद्दल अनेकांना उत्सुकता होती. रक्षाबंधनाच्या शुभदिनी राणी यांची प्रसुती झाली असून तिने एकाच वेळी चार सुंदर मुलींना जन्म दिला. चारही कन्यांचे वजन एक ते दीड किलो आहे. आई आणि मुलगी यांची प्रकृती उत्तम असून त्यांच्या विशेष काळजी घेण्यात येत आहे.