दीड वर्षाच्या चिमुकलीची कोरोनावर मात, पुष्पवर्षा व टाळ्या वाजवून स्वागत

चिमुकलीची कोरोनावर मात

Updated: May 4, 2020, 06:13 PM IST
दीड वर्षाच्या चिमुकलीची कोरोनावर मात, पुष्पवर्षा व टाळ्या वाजवून स्वागत title=

ठाणे : डोंबिवलीतील दीड वर्षाच्या चिमुकलीने कोरोनावर मात केली आहे. सध्या कोरोनाने जगभरात थैमान घातलं आहे. परंतु एका दीड वर्षाच्या चिमुकलीने या महाभयंकर आजाराशी दोन हात तर करत त्यावर मात केली. डोंबिवलीत डायलिसीससाठी गेलेल्या एक वृद्ध व्यक्तीला 18 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर एकाच कुटूंबातील पाच जणांना कोरोनाची लागण झाली. या पाच कोरोनाबधितांमध्ये एका दीड वर्षाच्या मुलीचा ही समावेश होता. 

आज या कुटुंबातील दीड वर्षाची चिमुकली उपचारानंतर बरी होऊन घरी परतली आहे. तर उर्वरित चार जणांवर अजूनही मुंबईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज दीड वर्षाची मुलगी घरी आल्यानंतर या चिमुकलीच्या स्वागतासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर विनिता राणे आणि त्यांचे पती नगरसेवक विश्वनाथ राण देखील उपस्थित होते. यावेळी पुष्पवर्षाव आणि टाळ्या वाजवून या चिमुकलीचं स्वागत करण्यात आलं.

कल्याण-डोंबिवलीत आज कोरोनाचे सर्वाधिक १८ रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे महापालिका हद्दीतील एकूण रुग्णांची संख्या २१३ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ६८ रुग्ण बरे झाले आहेत.