Lockdown : महाराष्ट्रातील 'या' पाच शहरांमध्ये अद्यापही दारू बंदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनचा कालावधी १७ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.    

Updated: May 4, 2020, 05:10 PM IST
Lockdown : महाराष्ट्रातील 'या' पाच शहरांमध्ये अद्यापही दारू बंदी  title=

मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनचा कालावधी १७ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये दारूची दुकानं आणि अनावश्यक वस्तूच्या दुकानांवरील बंदी हटवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परंतू महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये दारूची दुकानं पुन्हा सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही.  सोलापूर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये अद्यापही दारू बंदीचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. 

सोलापूर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यातील प्रशासनाने पुढील निर्देश दिल्या नंतर येथील दारूची दुकानं उघडण्यास परवानगी दिली जाईल. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अधिक फैलू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे एका जिल्हाधिकाऱ्याने सांगितले आहे. 

सुत्रांच्या म्हणण्यानुसार, बुलढाणा आणि अमरावती प्रशासनानेही १७ मे पर्यंत दारू विक्रीवर बंदी कायम ठेवली आहे. त्याचप्रमाणे फक्त आवश्यक वस्तू विकण्यास परवानगी दिली आहे. तर नागपूरमध्ये शहरी भागात दारू विक्रीवरील बंदी कायम ठेवण्यात आली असून ग्रामीण भागात मात्र दारू विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. 

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता गेल्या काही काळापासून राज्याच लॉकडाऊन  लागू करण्यात आला आहे. देशभरातही परिस्थिती काही वेगळी नाही. यात बऱ्याच काळापासून बहुतांश व्यवहार ठप्प झाले होते. पण, आता मात्र दारूची दुकानं सुरू ठेवण्याबाबत केंद्र सरकारच्या आदेशाची राज्यात अंमलबजावणी होणार आहे.