'नाणार' रद्द झालाच पाहिजे, विरोधकांची घोषणाबाजी

नानार प्रकल्पावरून काल विधानसभेत शिवसेनेसह विरोधी पक्षांनी घातलेल्या गोंधळानंतर आज विरोधक पुन्हा या मुद्यावर आक्रमक झाले आहेत. 'नाणार रद्द झालाच पाहिजे' अशी घोषणाबाजी विरोधकांनी विधिमंडळाच्या आवारात सुरु केलीय. 

Updated: Jul 12, 2018, 11:56 AM IST

नागपूर : नानार प्रकल्पावरून काल विधानसभेत शिवसेनेसह विरोधी पक्षांनी घातलेल्या गोंधळानंतर आज विरोधक पुन्हा या मुद्यावर आक्रमक झाले आहेत. 'नाणार रद्द झालाच पाहिजे' अशी घोषणाबाजी विरोधकांनी विधिमंडळाच्या आवारात सुरु केलीय. 

विरोधकांनी विधिमंडळाचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच विधानभवनाच्या पायर्‍यांवर आंदोलन केलं. नाणर प्रकल्प रद्द झालाच पाहिजे अशी घोषणाबाजी विरोधकांनी केली... तर शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेविरोधातही विरोधकांनी पायर्‍यांवर घोषणाबाजी केली.