'सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक' फडणवीसांचा आरोप

सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला 

Updated: Mar 3, 2020, 07:07 PM IST
'सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक' फडणवीसांचा आरोप  title=

मुंबई : सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सभागृहात समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने भाजपने आज सभात्याग केला. या पार्श्वभुमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. हे सरकार दिशाभूल करणारे आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील उत्तरे सरकारकडे नसल्याचा आरोप देखील फडणवीस यांनी यावेळी केला.

१०० दिवसात ते एकमेकांना समजू शकले नाही. १०० दिवसात त्यांनी आधी एकमेकांशी संवाद साधायला हवा असा टोला देखील त्यांनी लगावला. 

सरकारचा आम्ही निषेध करत आहोत, सरकार शेतकर्यांबाबत उदासीन आहे, सरकारने सरसकट कर्जमाफी सांगितली मात्र झाली नाही

महिलांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार सुरू आहे मात्र कायदा केला जात नाही, निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन कर्जमाफी केली जात आहे. ही फसवी कर्जमाफी असल्याचे फडणवीस म्हणाले.

दुसरी यादी जाहीर 

महाविकास आघाडी सरकारने घोषणा केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांची दुसरी यादी शनिवारी जाहीर झाली. या यादीत तब्बल २२ लाख शेतकर्‍यांचा समावेश आहे.

महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच २४ फेब्रुवारी रोजी ३५ लाख शेतकर्‍यांपैकी केवळ १५ हजार ५५८ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली होती.

यावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. त्यामुळे आता दुसरी यादी २२ लाख शेतकऱ्यांची जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.