पुणे : नवी मुंबई पालिका आयुक्त असताना तुकाराम मुंढे यांनी सर्वपक्षीय नेत्यांचा विरोध झाला होता. त्यानंतर मुंढे यांची उचलबांगडी करण्यात आली होती. आता तोच प्रत्यय पुण्यातही दिसून येत आहे. राजकीय नेत्यांना मुंढे यांची कामगिरी नको, असल्याचे या विरोधातून दिसून येत आहे.
मुंढे यांच्याविरोधात वातावरण तापले आहे. पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ झाला. पीएमपीएल विषयावर बोलावलेल्या विशेष सभेतून पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे निघून गेल्याने सभासद संतप्त झाले.
मुंढेंविरोधात सर्व पक्षीय सभासद आक्रमक झाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी मुंढेंवर कंपनी कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली. सभा सुरु असताना मुंढेंच निघून जाणं नगरसेवकांच्या चांगलचं जिव्हारी लागले आहे.