बातमतीत शेतकरी आंदोलकांचा उद्रेक

 सरकारनं सहा दिवस उलटले तरी शेतक-यांच्या संपाविषयी ठोस भूमिका न घेतल्यानं बातमतीतल्या आंदोलकांचा आज उद्रेक झाला. शेतकऱ्यांचा उद्रेक वाढत चालला आहे आज पवारांच्या बारामतीत  शहरातील प्रशासकीय भवन समोर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने जागरण गोंधळ घातला. यात राज्य सरकारच्या धोरणाचा गोंधळीच्या माध्यमातून बारामतीत उदो उदोचा गजर घुमला.

Updated: Jun 6, 2017, 05:12 PM IST
बातमतीत शेतकरी आंदोलकांचा उद्रेक title=

बारामती : सरकारनं सहा दिवस उलटले तरी शेतक-यांच्या संपाविषयी ठोस भूमिका न घेतल्यानं बातमतीतल्या आंदोलकांचा आज उद्रेक झाला. शेतकऱ्यांचा उद्रेक वाढत चालला आहे आज पवारांच्या बारामतीत  शहरातील प्रशासकीय भवन समोर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने जागरण गोंधळ घातला. यात राज्य सरकारच्या धोरणाचा गोंधळीच्या माध्यमातून बारामतीत उदो उदोचा गजर घुमला.

सरकारने मागण्या तात्काळ मान्य करून शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी प्रशासकीय कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. शेतकरी संघटनांनी सरकारी कार्यालयांना टाळं ठोकण्याचा इशारा दिला आहे. पुणतांब्यात शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात समोर सरकारचं प्रतीकात्मक दहावं घालून निषेध आणखी तीव्र केला आहे.