'Hats Of शरद पवार'! पंकजा मुंडे यांच्या ट्विटमुळे चर्चेला उधाण

 शरद पवार यांच्या कामाबाबत  पंकजा मुंडे यांनी जाहीरपणे कौतुक केले होते.  

Updated: Oct 28, 2020, 02:59 PM IST
'Hats Of शरद पवार'! पंकजा मुंडे यांच्या ट्विटमुळे चर्चेला उधाण title=

मुंबई : कोरोनाच्या परिस्थितीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार सातत्याने राज्यात दौरा करत आहेत. कोरोना काळ आणि परतीच्या पावसात शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने पुढाकार घेत आहेत. त्यांच्या या कामाबाबत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी जाहीरपणे कौतुक केले होते. तसेच त्यांना Hats Off केले आहे. याबाबत आमदार  रोहित पवारांनी त्यांचे आभार मानले आहेत.

Hats Off इतका दौरा,  आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले. पक्ष, विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तर कष्ट करणाऱ्या विषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबानी शिकवले आहे, असे म्हणत शरद पवार यांचे कौतुक केले होते. मंगळवारी पुण्यात  राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पंकजा  मुंडेही उपस्थित होत्या. ऊसतोड कामगारांचा प्रश्न सुटल्यानंतर समाधानही त्यांनी व्यक्त केले होते. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी ट्विट करत शरद पवारांना सलाम केला आहे.

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी ट्विट करत शरद पवारांना सलाम केला होता. त्यांच्या या ट्विटवर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी पंकजा मुंडे यांच्या ट्विटचा धागा पकडत विरोधकांना टोला लगावला. रोहित यांनी ट्विट करताना म्हटले, “धन्यवाद ताई! राजकारणातील हा दिलदारपणा आणि खिलाडूवृत्ती ही फक्त महाराष्ट्रात दिसते. महाराष्ट्राची ही संस्कृती आहे. पण अलीकडे आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्याचा अवमान करणाऱ्यांनी आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा”.