Petrol Diesel Price on 11 Jan 2024 : येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर 7 ते 8 रुपयांनी कमी होणार अशी चर्चा सुरु आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोल 106 रुपयांवरुन 98 ते 99 रुपये प्रति लीटरवर येण्याची चिन्हे आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्चा तेलाच्या किमतीत मोठी घसणर झाल्यामुळे तसेच आगामी लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केंद्र सरकार हा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारल्या जातात. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोलचे दर जाहीर केले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी इ. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतीय इंधनाच्या किमती वाढतात. दरम्यान देशातील काही राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर थोडे कमी झाले आहेत, तर काही राज्यांमध्ये दरात कोणताही बदल झालेला नाही. यापूर्वी पेट्रोल आणि डिझेलचे दर 15 दिवसांनी बदलले जात होते. परंतु, जून 2017 पासून काहीही बदल झाला नाही.
2024 च्या निवडणुकीपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होण्याची शक्यता आहे. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत थोडी घसरण झाली आहे. WTI क्रूड प्रति बॅरल $71.29 वर विकले जात आहे. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 76.80 वर व्यापार करत आहे. तर उत्तर प्रदेशात अचानक पेट्रोल 35 पैशांनी आणि डिझेल 34 पैशांनी स्वस्त झालं. बिहारमध्ये पेट्रोल 29 पैशांनी तर डिझेल 27 पैशांनी स्वस्त झाले आहे. चला तर मग महाराष्ट्रातील इतर राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेऊया.
मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
पुण्यातील पेट्रोल 106.20 रुपये आणि डिझेल 92.71 रुपये प्रति लिटर
ठाण्यातील पेट्रोल 106.38 रुपये आणि डिझेल 94.34 रुपये प्रति लिटर
नाशिकमध्ये पेट्रोल 105.88 रुपये आणि डिझेल 92.41 रुपये प्रति लिटर
नागपूरमध्ये पेट्रोल 106.08 रुपये आणि डिझेल 92.63 रुपये प्रति लिटर
कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.75 रुपये आणि डिझेल 93.28 रुपये प्रति लिटर
तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर एसएमएसद्वारे देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP <डीलर कोड> 9224992249 वर पाठवू शकतात किंवा HPCL ग्राहक 9222201122 किंवा नंबरवर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक RSP <डीलर कोड> 9223112222 या क्रमांकावर पाठवू शकतात.