मुख्यमंत्र्यांकडे सादर झालेला पोलिस बदल्या आणि फोन टॅपिंगसंदर्भातला अहवाल झी 24 तासच्या हाती

पोलिसांच्या बदल्यांमध्ये रॅकेट असल्याचा आरोप होत असतानाच नवी माहिती समोर आली आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी हा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केला आहे. झी 24 तासच्या हाती ही एक्स्क्लुझिव्ह माहिती आलेली आहे.

Updated: Mar 25, 2021, 09:25 PM IST
मुख्यमंत्र्यांकडे सादर झालेला पोलिस बदल्या आणि फोन टॅपिंगसंदर्भातला अहवाल झी 24 तासच्या हाती title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंगबाबतचा अहवाल राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे अहवाल सादर केलाय. हा अहवाल झी २४ तासच्या हाती आलाय. रश्मी शुक्ला यांनी दिशाभूल करून फोन टॅपिंग केल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय. त्यांच्यामुळे त्यांच्या दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला असून त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. 

काय आहे या अहवालात?

  1. कुंटे यांचा अहवाल 'झी २४ तास'च्या हाती

  2. फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला दोषी, कडक कारवाई होण्याची शक्यता

  3. पोलीस बदल्यांबाबत रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंग अहवालातील निष्कर्ष चुकीचे

  4. शुक्ला यांनी उल्लेख केलेल्या काळात कोणत्याही बदल्या झाल्या नाहीत

  5. अहवालात नावं असलेल्या अधिकार्‍यांच्या बदल्या त्यांनी उल्लेख केलेल्या ठिकाणी झाल्याच नाहीत

  6. शुक्ला यांनी दिशाभूल करून फोन टॅपिंगची परवानगी मिळवली

  7. शुक्ला यांनी सादर केलेल्या अहवालासोबत पेन ड्राईव्ह नव्हताच

  8. दिशाभूल करून फोन टॅपिंग केल्याबद्दल शुक्ला यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्याचे ठरले

  9. 25 फेब्रुवारी 2020 ते 26 जून 2020 या कालावधीत 13 IPS अधिकार्‍यांच्या बदल्या

  10. अपवाद वगळता इतर सर्व बदल्या पोलीस आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार

  11. 27 जून 2020 ते 1 सप्टेंबर 2020 पर्यंत एकाही IPS अधिका-याची बदली नाही

  12. 2 सप्टेंबर 2020 ते 28 ऑक्टोबर 2020 या कालावधीत 154 अधिका-यांच्या बदल्या

  13. 140 बदल्या पोलीस आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार

  14. शुक्ला यांनी दहशतवादी हल्ले आणि दंगलीचं कारण देऊन काही व्यक्तींच्या फोन टॅपिंगची परवानगी घेतली

  15. त्या खाजगी व्यक्तींच्या संभाषणात पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांबाबत उल्लेख

  16. या अहवालात CDR छाननीनुसार कोणतेही ठोस पुरावे नसल्याचं नमूद

  17. या फोन टॅपिंगनुसार रश्मी शुक्ला यांचा अहवाल स्पष्ट नाही

  18. कोरोना व्यवस्थापनाला प्राधान्य असल्याने एकही IPS अधिका-याची बदली करण्यात आली नाही

  19. त्यामुळे अहवालावर कार्यवाही करण्याची गरज भासली नाही

  20. ही बाब माहित झाल्यानंतर मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि कुंटे यांची भेट घेऊन शुक्ला यांची दिलगिरी

  21. पतीचे निधन आणि मुलांच्या शिक्षणाचं कारण देत त्यांच्याकडून चूक कबूल

  22. महिला अधिकारी असल्याने आणि चूक कबूल केल्याने सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून शुक्ला यांच्यावर पुढील कारवाई झाली नव्हती