कैलास पुरी, झी मिडिया, पिंपरी : जुन्या वादातून भांडण, पैसे किंवा प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याच्या बातम्या आपण ऐकत असतो. पण पिंपरीत हत्येची एक विचित्र घटना समोर आली आहे. या घटनेत मित्रानेच मित्राची हत्या (Murder) केली. हत्येचं कारण ऐकून पोलीसही हैराण झाले असून पोलिसांनी (Pimpri Police) आरोपीला अटक केली आहे. एकत्र दारू प्यायला बसलेल्या दोन मित्रांमध्ये भांडण झालं. एका मित्राने दारुच्या नशेत दुसऱ्या मित्राकडे रक्त पिण्याची मागणी केली. सुरुवातीला दुसऱ्या मित्राला मस्करी वाटली. पण मागणी करणाऱ्या मित्राने रक्त पिण्यासाठी खरोखऱच त्याच्या गळ्याचा चावा घेतला.
इश्तीयार खान आणि राहुल लोहार अशी त्या दोन मित्रांची नावं आहेत. यापैकी इश्तीयार खानने रक्त पिण्यासाठी राहुलच्या गळ्याचा चावा घेतला. पण राहुलने त्याच्या तावडीतून सुटका करुन घेतली. पण घटनेचा राग राहुलच्या मनात होता. बदला घेण्यासाठी राहुल त्याच दिवशी रात्री साडे अकरा वाजता पुन्हा घटनास्थळी पोहोचला. यावेळी इश्तीयार खान झोपला होता. राहुलने झोपेत असलेल्या इश्तियारच्या डोक्यात दगड टाकून त्याची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरु करुन आरोपी राहुल लोहारल अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इश्तीयार आणि राहुल हे दोघंही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत.
या घटनेने पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
बापाने केली मुलाची हत्या
दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत एका बापाने आपल्या व्यसनधीन मुलाची निर्घृण हत्या केली. सांगीलतल्या मिरजमध्ये ही घटना घडली आहे. आरोपी बापाने पोटच्या मुलाचा खून केला. त्यानंतर मृतदेहाचे कटरने दोन तुकडे केले आणि ते तलावात फेकून दिला. याप्रकरणी मिरज शहर पोलिसांनी आरोपी बाप राजेंद्र हंडीफोडे याला अटक केली आहे. तर मृत मुलाचं नाव रोहित हंडिफोडे असं होतं.
मिरज शहरातील सुभाष नगर इथं राहाणाऱ्या राजेंद्र यांनी कुऱ्हाडीने रोहितचा खून करून कटरने दोन तुकडे केले. यानंतर एक तुकडा शहरातल्या गणेश तलावात टाकला तर दुसरा तुकडा गणेश तलावाच्या शेजारीत असणाऱ्या घरामध्ये ठेवला होता.या खुनाच्या घटनेनंतर राजेंद्र हंडीफोड स्वतः पोलीस ठाण्यामध्ये हजर झाले आणि त्यांनी मुलाच्या खुनाची कबुली दिली. त्यानंतर मिरज पोलिसांनी गणेश तलावातून रोहित हंडीफोड याच्या शरीराचा एक तुकडा बाहेर काढला आहे,तर दुसरा तुकडा त्याच्या घरात आढळून आला. या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये हत्येची नोंद झाली असून आरोपी पित्याला अटक करण्यात आली आहे. मृत रोहित हंडीफोडे याला दारू आणि जुगाराचे व्यसन होतं, यातून तो कुटुंबाला प्रचंड त्रास देत होता.नया त्रासाला कंटाळूनच राजेंद्र हंडीफोडने हा खून केल्याचे पोलीसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे.