CM Eknath Shinde: कोव्हीड काळात 300 रूपयांची बॅग 2 ते 3 हजारांना खरेदी करण्यात आली असा आरोप मुख्यमंत्र्यांनी तत्कालिन पालिका आणि ठाकरे गटावर केला. या घोटाळ्याची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक करवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनातील अखेरच्या दिवसाचे अंतिम भाषण केले. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांना हात घालत ठाकरे गटावर टिका केली.
कोरोना काळात लाईफ लाईन हॉस्पिटलला काम दिली. डॉक्टर नव्हते तरी कामे घेतली गेली. मढ्याच्या टाळूच लोणी खायचे काम करण्यात आल्याची टिका यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. मी सूड भावनानं काम करणार नाही पण वस्तुस्थिती धरून मात्र कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
आम्हाला गद्दार म्हणारे पत्र देतात आणि 50 कोटींची मदत मागतात. असे असले तरीही मी तात्काळ पैसे द्यायचे मान्य केले, असेही त्यांनी सांगितले.
ज्यांना बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराशी देणेघेणे नाही, त्यांना शिवसैनिंकाचे काही पडले नाही. त्यांना फक्त पैसा हवाय, अशी टिका त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली.
विरोधकांमध्ये गोंधळलेली परिस्थितीत दिसते. त्यांच्यात आत्मविश्वास कमी दिसतो. जयंतराव आपल्या सोबत हवे असे मी आधीच म्हटले होते, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रातील उद्योग बाहेर गेले असा आरोप करण्यात आला. त्यानंतर आम्ही श्वेतपत्रिका काढली. अडीच वर्षात महाविकास आघाडी प्रकल्प थांबवले. हे सर्व प्रकल्प इगोमुळे प्रकल्प थांबविले. सगळीकडे आता प्रकल्प सुरू केले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
आम्ही फेसबूक आणि घरी बसून काम करणारे सरकार नाही. 24 तास काम करणारे आमचे सरकार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
दररोज सीएम बदलणार सरकार बदलणार असे बोलत होते. पृथ्वीराज आणि माझे जिल्ह्यातील चांगले संबंध आहेत तरीही सीएम बदलणार असे ते म्हणत राहीले. त्यानंतर आमचे सरकार अधिक मजबूत होत गेले असे मुख्यमंत्री म्हणाले.