Crime News : दारुच्या नशेत महिलेच्या घरात घुसला अन्... ACP च्या धक्कादायक कृत्यामुळे पोलीस दलात खळबळ

संभाजीनगरच्या गुन्हे शाखेच्या सहाय्यक आयुक्त  विशाल ढुमे  वर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर ढुमेची तातडीने बदली करण्यात आली आहे. पोलीस कंट्रोल रुमला विशाल ढुमेची बदली झालीय. महिलेच्या घरात जाऊन तिचा विनयभंग केल्याचा आरोप विशाल ढुमेवर आहे. 

Updated: Jan 15, 2023, 07:17 PM IST
Crime News : दारुच्या नशेत महिलेच्या घरात घुसला अन्...  ACP च्या धक्कादायक कृत्यामुळे पोलीस दलात खळबळ title=

Sambhaji Nagar Crime : पोलीस दलात खळबळ उडवणारी धक्कादायक घटना संभाजीनगरमध्ये घडली आहे. संभाजीनगरमध्ये दारूच्या नशेत पोलिस एसीपीने महिलेचा विनयभंग (Police ACP molested woman) केला आहे. विशाल ढुमे असे या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. महिलेच्या घरात घुसून या पोलिसाने हे कृत्य केले (Sambhaji Nagar Crime). 

संभाजीनगरच्या गुन्हे शाखेच्या सहाय्यक आयुक्त  विशाल ढुमे  वर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर ढुमेची तातडीने बदली करण्यात आली आहे. पोलीस कंट्रोल रुमला विशाल ढुमेची बदली झालीय. महिलेच्या घरात जाऊन तिचा विनयभंग केल्याचा आरोप विशाल ढुमेवर आहे. 

काय आहे नेमका प्रकार

शनिवारी रात्री ढुमे एका हॉटेलमध्ये बसला होता. यावेळे त्याने मद्य प्राशन केले. येथे एक महिला आपल्या कुटुंबीयांसोबत आली होती. ढुमे याने महिलेशी बोलण्याचा प्रयत्न केला. यानंतर या महिलेचा पाठलाग करत एसीपी ढुमे त्या  महिलेच्या घरी गेला आणि तिचा विनयभंग केला  अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. ढुणे थेट घरात जाऊन महिलेचा हात पकडला अशी माहिती मिळते यातून रात्री बराच वाद झाला आणि त्यानंतर आता गुन्हा दाखल झाला. मात्र एसीपी दर्जाचा अधिकारी असा वागत असेल तर निश्चित पणे ही दुर्दैवी बाब म्हणावी लागेल.

संभाजी नगर पोलिसांतील अती वरिष्ठ अधिकाऱ्याने केलेल्या या कृत्याने शहर पोलिसांची मान शरमेने खाली झुकली आहे. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांच्या कडे शहरातील उस्मानपूरा भागाचा एसीपी चार्ज होता. तर, शहरातील ट्रॅफिक नियंत्रणाचा ही चार्जही त्यांच्याकडेच होता. यांच्यावर वरिष्ठांची मर्जी होती का असा प्रश्न प्रडतो? 

महत्वाचं म्हणजे यापूर्वी अहमदनगरला असतानाही ढुमेंनी दारू पिऊन गोंधळ घातला होता. नवरदेवाला वरातीत मारहाण केलेली. इतकंच नाही तर शहरातल्या काही महिला पोलीस कॉन्स्टेबलनीही ढुमेंबाबत तक्रारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता संभाजीनगर पोलीस आयुक्तांनी कारवाई केली असून, पुढील तपास सुरू आहे.  जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्यावर असा पोलिसांनीच अशा प्रकारचे कृत्य केल्याने खळबळ उाडली आहे. ढुमे यांची बदली करुन चालणार नाही. ढुमेवर थेट निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.