close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

नकली सोने विकणारी टोळी जेरबंद

अमरावतीत नकली सोने विकणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली. 

Updated: Jul 22, 2019, 05:33 PM IST
नकली सोने विकणारी टोळी जेरबंद

श्रीकांत राऊत, झी मीडिया, अमरावती : अमरावतीत नकली सोने विकणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली. मोर्शी चांदुर बाजार रोडवर तीन इसम स्वस्त दरात सोने विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी या तीन आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडे ३ ग्राम नकली सोने व इतर साहित्य असा १ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळाल्याने तो जप्त करण्यात आला. 

स्वस्त दरात सोनं देण्याचे आमिष देऊन हे भामटे ग्रामीण भागातील ग्रामस्थांना गंडवित असल्याचे समजताच नकली सोने विकणाऱ्या तिघांनाही पोलिसांनी अटक केली, त्यांनी आणखी काही गुन्हे केले का याबाबत तपास केल्या जात आहे.