नागपूर: चलाख पोलीस बापाचा मुलीने केला पर्दाफाश

पत्नीचा निर्दयीपणे खून करून तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचणाऱ्या चलाख पोलिसाचा त्याच्याच मुलीने पर्दाफाश केला आहे. सात वर्षाच्या चिमुकलीने दिलेल्या जबाबामुळे पोलीस तपासाची बंद होत आलेली फाईल पुन्हा उघडली गेली आणि पोलिसाच्या दृष्कृत्याचा भांडाफोड झाला.

Updated: Oct 4, 2017, 10:05 AM IST
नागपूर: चलाख पोलीस बापाचा मुलीने केला पर्दाफाश title=

नागपूर : पत्नीचा निर्दयीपणे खून करून तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचणाऱ्या चलाख पोलिसाचा त्याच्याच मुलीने पर्दाफाश केला आहे. सात वर्षाच्या चिमुकलीने दिलेल्या जबाबामुळे पोलीस तपासाची बंद होत आलेली फाईल पुन्हा उघडली गेली आणि पोलिसाच्या दृष्कृत्याचा भांडाफोड झाला.

काही वर्षांपूर्वी वैशाली हिचा देवेंद्र नागमोते या पोलीस तरूणाशी विवाह झाला. त्यांना ७ वर्षांची मुलगीही आहे. नागपूरमधील वाडी परिसरात हे दाम्पत्य राहात होते. दरम्यान, ३० सप्टेंबर या दिवशी वैशालीचा भाजून मृत्यू झाला. पोलीस तपासात तिचा पती देवेंद्र याने घरातील भांडणातून तिने स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केल्याचे सांगितले. पोलिसांनी तपास केला. पण, विशेष काही हाती लागले नाही. त्यामुळे पोलीस तपासाची फाईल बंद होणार होती. मात्र, सात वर्षाच्या मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबाने प्रकरणाला कलाटणी मिळाली.

वैशाली नागमोतेच्या सात वर्षांच्या चिमूकलीने आपल्या आईला वडलांनीच जाळून मारल्याचा धक्कादायक जबाब दिला आणि वैशालीच्या खूनाचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी दिलेल्या जबाबात वडील रोज दारु पिऊन आईला मारायचे असंही या चिमुकलीनं पोलिसांना सांगीतलं.

मुलीचा जबाब ग्राह्य धरून पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवली. तेव्हा, चारित्र्याच्या संशयावरुन देवेंद्र नागमोतेनं वैशालीला जाळून मारल्याचं तपासात निष्पन्न झाल्याची माहिती वाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरेश पवार यांनी दिली.