Pune Policeman Viral Video: पुणे तिथं काय उणे, असं आपण सहज म्हणतो. पुण्यातील काही व्हिडिओ (Pune Viral Video) नुकतेच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याचं दिसत होतं. अशातच आता एका व्हिडिओने सध्या सर्वांचं लक्ष वेधलं आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलीस कर्मचारी प्लॅटफॉर्मवर (Pune Railway Platform) झोपलेल्या लोकांवर पोलिस बाटलीतून पाणी ओतताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ (Shocking Video) तुफान प्रतिक्रिया येत असून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर (Pune Railway Station) झोपलेल्या लोकांना उठवण्यासाठी पोलिस बाटलीतून पाणी ओतताना दिसतोय. ट्विटवर हा व्हिडिओ एका नेटकऱ्याने शेअर केला असून हा व्हिडिओ पुणे रेल्वे स्टेशनवरील असल्याचा दावा केलाय. व्हिडिओ ट्रेडिंगमध्ये आल्याने पुण्याच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) इंदू दुबे यांचंही लक्ष वेधलं गेलंय. त्यावर त्यांनी संताप व्यक्त केलाय.
Sleeping on the Platform causes inconvenience to others however the way it was handled is not a suitable way of counseling passengers. Concerned staff has been suitably advised to deal with passengers with dignity, politeness & decency. This incident is deeply regretted.
— Smt. Indu Dubey (@drmpune) June 30, 2023
प्लॅटफॉर्मवर झोपल्यानं इतरांची गैरसोय होते, परंतु ज्या पद्धतीने प्रकरण हाताळले गेलं, ती पद्धत प्रवाशांना सल्ला देण्याचा योग्य मार्ग नाही. संबंधित कर्मचार्यांना प्रवाशांशी आदर, सौजन्यानं आणि सभ्यतेनं वागण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या घटनेबद्दल मनापासून खेद आहे, असं इंदू दुबे यांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा - माशांमुळं 'या' गावातील मुलं आहेत अविवाहित, लग्नासाठी कोणी मुलगीच देईना!\
दरम्यान, व्हायरल झालेल्या (Viral Video) या व्हिडिओला 2 दशलक्ष पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लज्जास्पद अशी कमेंट करत अनेकांनी यावर खोचक प्रतिक्रिया दिलीये. सरकारने अधिक वेटिंग एरिया तयार करावं, जेणेकरुन त्यांना प्लॅटफॉर्मवर झोपावं लागणार नाही आणि ट्रेन वेळेवर असावी, असा सल्ला नेटकऱ्यांनी रेल्वे प्रशासनाला दिला आहे. प्लॅटफॉर्मवर न झोपण्याच्या नियमाची किंवा कायद्याची अंमलबजावणी करण्याचा हा एक अतिशय सौम्य मार्ग वाटतो, असंही नेटकरी म्हणत आहेत.