नाशिककरांचं आरोग्य धोक्यात

नाशिक महापालिकेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना दुषित पाणी पुरवठा होत असल्याचं निदर्शनास आलंय. महापालिकेनं तपासणी केलेल्या मोहिमेत २५ नमुने दूषित आढळले आहेत. 

Updated: Aug 10, 2017, 09:32 PM IST
नाशिककरांचं आरोग्य धोक्यात title=

मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक : नाशिक महापालिकेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना दुषित पाणी पुरवठा होत असल्याचं निदर्शनास आलंय. महापालिकेनं तपासणी केलेल्या मोहिमेत २५ नमुने दूषित आढळले आहेत. 

नाशिक शहरात साथीच्या आजारांचा धुमाकूळ सुरूच आहे. त्यात आता पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचीही भर पडतेय. मनपाकडूनच दुषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचं उघड झालंय. जुलै महिन्यात मनपाने तपासणी केलेल्यापैकी २५ नमुने दूषित निघाले. 

गंगापूर धरणातून येणारं पाणी दुषित असल्याचं दिसून आलंय. शहरात काही भागात जलवाहिनीला गळती लागलीय. काही ठिकाणी ड्रेनेज लाईनजवळून जलवाहिनी गेलीय. त्यामुळे पाणी दुषित झाल्याचं दिसून आलंय. मात्र याबाबत तात्काळ शुद्धीकरण कारवाईला सुरूवात झालीय. 

परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला जात असला तरी वस्तुस्थिती वेगळीच आहे. ऐन पावसाळ्यात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. त्यामुळे आता नागरिकांनी स्वतःच पाणी गाळून उकळून घेण्याची गरज आहे.