पूजा चव्हाणच्या चुलत आजीचा गौप्यस्फोट

पूजाच्या मृत्यूनंतर 20 दिवसांनी संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे.   

Updated: Mar 1, 2021, 04:56 PM IST
पूजा चव्हाणच्या चुलत आजीचा गौप्यस्फोट

पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगत आहे. पूजाच्या मृत्यूनंतर 20 दिवसांनी संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. राठोड यांच्या राजीनाम्यानंतर देखील पूजाची आजी आणि भाजप नेते यांचा आक्रमक पवित्रा कायम असल्याचं दिसत आहे. आता पूजाच्या चुलत आजी शांता राठोड एक गौप्यस्फोट केला. पूजाच्या आई-वडिलांना संजय राठोड यांनी पाच कोटी रुपये पोहोचवले आहेत, असं वक्तव्य पूजाच्या आजीने केलं आहे. 

'पूजाच्या आई-वडिलांना संजय राठोड यांनी पाच कोटी रुपये पोहोचवले आहेत. त्यामुळेच त्यांना पूजाच्या हत्येविषयी बोलायचे नाही. पैशामुळे माझे चुलत आजी नातेही त्यांना दिसत नाही. मुख्यमंत्र्यांनी पूजाच्या आई वडिलांनी दिलेल्या खोट्या माहितीला बळी पडू नये असं म्हणत पूजाला न्याय द्यावा असं देखील त्या म्हणाल्या आहे. 

दरम्यान, संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.  संजय राठोड यांनी पत्नीसह वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे राजीनामा सोपवलाय. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण राठोड यांना भोवलंय आणि राजीनामा द्यावा लागला. 

राजीनामा देतो पण चौकशी पूर्ण होईपर्यंत राजीनामा स्वीकारु नका, अशी विनंती राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना केल्याचं समजतंय. पूजा चव्हाणनं आत्महत्या केल्यानंतर २० दिवसांनी राठोडांनी राजीनामा दिला.