'महाराष्ट्रात घडलेला विजेचा ब्रेकडाऊन हा सायबर हल्ला'

मुंबईसह महाराष्ट्रात वीज खंडीत 

Updated: Jan 25, 2021, 08:43 AM IST
'महाराष्ट्रात घडलेला विजेचा ब्रेकडाऊन हा सायबर हल्ला' title=

मुंबई : काही दिवसांपूर्वी  मुंबईसह राज्यात वीज पुरवठा खंडीत (Electricity) झाला होती. ही घटना सायबर हल्ल्याचा (Power Breakdown in Cyber Attack)  प्रकार होता, असे संकेत गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी दिलेत. नागपुरात पोलीस महासंचालक शिबीर कार्यालयाच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. सध्या सायबर गुन्हे आणि सायबर हल्ले वाढले असून त्यासंदर्भात सावध राहण्याची गरज देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रात घडलेला विजेचा ब्रेकडाऊन कशा पद्धतीने घडला होता? हा प्रश्न साऱ्यांनाच पडला होता. या प्रश्नाला पोलीस विभागातील सायबर एक्स्पर्टसनी उत्तर दिलं आहे. हा सायबर हल्ला असल्याची माहिती ऊर्जा विभागाला  दिल्याचे अनिल देशमुख म्हणाले. 

मुंबईसह उपनगरांमध्ये १२ ऑक्टोबर रोजी वीजपुरवठा खंडित झाला होता.दरम्यान, यानंतर वीज पुरवठा खंडित होण्याबाबत राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी धक्कादायक ट्विट केलं.सर्किटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं वीज गेल्याचं ऊर्जामंत्र्यांसह महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. मात्र, वीज पुरवठा खंडित झाल्या प्रकरणात ऊर्जामंत्र्यांनी ट्विट करत नवी खळबळ उडवून दिली .

वीज पुरवठा करणाऱ्या टाटा पॉवर सप्लायचा कळवा येथील ग्रीड फेलियर झाला होता. ज्यामुळे संपूर्ण एमएमआर रिजनचा विद्युत पुरवठा खंडित झाला. ज्यामुळे पूर्ण मुंबई अंधारात बुडाली होती. यापूर्वी असं कधीही झालं नव्हतं. मात्र, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी यामागे सायबर हल्ला असण्याची शंका व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सायबर सेलने याचा तपास सुरू केला आहे.

विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर आधी तांत्रिक बिघाड असल्याचं सर्वांना वाटलं. मात्र, नितीन राऊत यांनी या पाठीशी सायबर हल्ल्याचा संशय व्यक्त केल्याने खळबळ निर्माण झाली आणि महाराष्ट्र सायबर सेल याच्या तपासाला लागलं आहे.