नियम मोडण्यासाठीच पंढरपुरात आलो आहे - प्रकाश आंबेडकर

मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी प्रकाश आंबेडकर यांचं पंढरपुरात आंदोलन

Updated: Aug 31, 2020, 01:28 PM IST
नियम मोडण्यासाठीच पंढरपुरात आलो आहे - प्रकाश आंबेडकर title=

मुंबई : मंदिर खुली करण्याच्या मागणीसाठी प्रकाश आंबेडकर पंढरपुरात दाखल झाले आहेत. पंढरपुराला छावणीचं स्वरुप आलं आहे. पण मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमल्यामुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला आहे. याबाबत प्रश्न विचारला असता. आपण नियम मोडण्यासाठीच आलो असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

कोरोनाची भीती लोकांच्या मनातुन घालवायची आहे. सरकारकडून अजून कोणीही माझ्याशी बोललेलं नाही. दारू, दुकान, एसटी असं सगळं सुरू केलं. मोबाईलच्या माध्यमातून कोरोनाची भीती पसरवली जात आहे. लोकांच्या भावना असलेली धार्मिक स्थळ सुरू करावी. सरकारने अंत पाहू नये, आजची परिस्थिती बघून सरकार लवकर निर्णय घेईल असं वाटतं. माझ्या प्रत्येक आंदोलनाला यशच आलं आहे. त्यामुळे मंदिर लवकरच खुली होतील, दुसरं काही करायची गरज पडणार नाही. असं देखील प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना आणि आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं आहे. तसेच आंदोलकांनी अंतर ठेऊन उभे राहण्याचं आवाहन देखील आंदोलकांना केलं आहे. 

पंढरपुरात ४५० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. बॅरिगेट्स न मोडण्याचं आवाहन वंचितचे नेते आंदोलकांना करत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाईल. असं त्यांनी म्हटलं आहे. 

प्रकाश आंबेडकरांची जिल्हाधिकऱ्यांसोबत चर्चा झालेली नाही. प्रकाश आंबेडकरांनी दीड तास वाट बघितली त्यानंतर शासकीय विश्रामगृहावरून ते आंदोलन स्थळाकडे निघाले. प्रकाश आंबेडकर आंदोलनावर ठाम आहेत.