एकबोटे आणि भिडेंना अटक का नाही? - आंबेडकरांचा सवाल

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात अॅट्रोसिटीसारखा गंभीर गुन्हा दाखल होऊनही मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांना अजून अटक का झालेली नाही? असा परखड सवाल प्रकाश आंबेडकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 16, 2018, 12:06 PM IST
एकबोटे आणि भिडेंना अटक का नाही? - आंबेडकरांचा सवाल title=

नागपूर : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात अॅट्रोसिटीसारखा गंभीर गुन्हा दाखल होऊनही मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांना अजून अटक का झालेली नाही? असा परखड सवाल प्रकाश आंबेडकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केलाय.

शासनानं लवकरात लवकर या प्रकरणात लक्ष घालून आरोपींना अटक करावी... ही अटक झाली नाही तर पुन्हा नारे - निदर्शने करण्यास आम्ही तयार आहोत, असं म्हणत आंबेडकरांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिलाय. 

आंदोलकांना मी त्यांना थोपवून ठेवलं आहे, शासनाने अटक केली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा धमकीवजा इशारा त्यांनी दिलाय. 

'या प्रकरणात कोम्बिंग ऑपरेशन करण्याचा अधिकार नाही, याच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात जाऊ, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय.