No CNG in Pune: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! आज मध्य रात्रीपासून बंद राहणार सीएनजी पंप

 टोरंट गॅस कंपनीकडून पुरवठा करण्यात येणाऱ्या सीएनजी वरील कमिशन वाढवून देण्याची पंपचालकांची मागणी आहे.

Updated: Jan 26, 2023, 06:55 PM IST
No CNG in Pune: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! आज मध्य रात्रीपासून बंद राहणार सीएनजी पंप title=

No CNG in Pune: आपल्या दैनंदिन जीवनात सीएनजी, पीएनजी गॅसला (CNG Gas, PNG Gas) तितकेच महत्त्व आहे परंतु नुकत्याच आलेल्या माहितीमुळे आता सीएनजीधारकांची त्रेधातिरपिट उडणार आहे. आज मध्यरात्रीपासून पुणे जिल्ह्यातील सीएनजी पंप बंद राहणार असल्याची घोषणा करण्यात आली. यासाठी पंपचालकांच्या मागण्या आडव्या आल्या आहेत. त्यामुळे याचा त्रास सामान्य ग्राहकांनाही सहन करावा लागणार आहे. आज मध्यरात्री पासून पुणे जिल्ह्यातील सीएनजी पंप बंद राहणार आहेत. टोरंट गॅस कंपनीकडून (Torrent Gas Company) पुरवठा करण्यात येणाऱ्या सीएनजी वरील कमिशन वाढवून देण्याची पंपचालकांची मागणी आहे. (Pune breaking news there will be cng cut in pune city from today midnight how it will effect you)

त्याबाबतचा करार 2021 मध्येच झाला होता. असं असतानाही कमिशन वाढवून मिळत नाही. त्यामुळे पेट्रोल डिझेल डीलर्स असोसिएशननं (Petrol Diesel Dealers Association) याआधी देखील तीन वेळा बंद पुकारला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थी नंतर तो मागे घेण्यात आला. टोरंट गॅस कंपनीकडून आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे असोसिएशन पुन्हा एकदा सीएनजीची खरेदी विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम म्हणून पुण्याच्या ग्रामीण भागात वाहनांना सीएनजी मिळणार नाही आहे. 

नेमकं प्रकरण काय? 

गुजरात येथील टोरेंस गॅस या कंपनीच्या विरोधात पुणे ग्रामीण मधील सीएनजी पंप चलाक हे संपावर जाणार आहेत.  त्यामुळे आज मध्यरात्रीापासून पुण्यातील ग्राहकांना सीएनजी मिळणार नाही. शासनाकडून अजूनही याआधी मंजूर करण्यात आलेले वाढीव कमिशन देण्यात कंपनीनं टाळाटाळ केली आहे त्यामुळे याचाच परिणाम म्हणून पंपचालकांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. 27 जानेवारी सीएनजी गॅसची खरेदी - विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील पत्रही जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आलं आहे. 

पुणे शहरातील नॅचरल गॅस लिमिटेडनं (Natural Gas) वाढीव कमिशन हे विक्रेत्यांना दिलं असून ग्रामीण भागात मात्र हे कंपनी टाळाटाळ करत आहे. यापुर्वीही यासाठी चालकांना संप पुकारला होता. यासाठी जिल्हाधिकारी आणि विक्रेते व कंपनीचे व्यवस्थापक यांच्या बैठकाही घेतल्या गेल्या होत्या. दुसऱ्यांदा कमिशन वाढवून देण्याची मागणी करण्यात आली परंतु यावर कुठलीच कृती न झाल्यानं मात्र चालकांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती समोर येते आहे. 

हे कमिशन दिले गेले नाही म्हणून सीएनजी वितरकांचे 8 कोटींचे नुकसानही झाले आहे असंही कळते.