उपचारादरम्यान लाडक्या मांजराचा मृत्यू, क्लिनिकची तोडफोड करत डॉक्टरांना बेदम मारहाण

Pune cat news: आपल्या लाडक्या मांजरीच्या मृत्यू तिच्या मालकाला दु:ख होण्यापेक्षा रागच अधिक आला. तेव्हा आपल्या लाडक्या मांजरीचा मृत्यू झाल्यानं चक्क या इसमांनी डॉक्टरवर तर दादागिरी केलीच परंतु सोबतच त्यांनी अख्ख्या क्लिनिकमध्येही (cat death news) रोजदार राडा केला.

Updated: Dec 15, 2022, 02:24 PM IST
उपचारादरम्यान लाडक्या मांजराचा मृत्यू, क्लिनिकची तोडफोड करत डॉक्टरांना बेदम मारहाण title=
pune cat news

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: तुम्हा आम्हाला राग येतो हे खरंय. आपल्या प्रियजनांना जराही दुखापत झाली तरी आपल्याला फार दु:ख होते त्यामुळे आपल्यालाही अनेकदा रागही येतो, परंतु सध्या असाच एका घटनेनं सगळीकडेच खळबळ (shocking news) माजवून दिली आहे. आपल्या लाडक्या मांजरीच्या मृत्यू तिच्या मालकाला दु:ख होण्यापेक्षा रागच अधिक आला. तेव्हा आपल्या लाडक्या मांजरीचा मृत्यू झाल्यानं चक्क या इसमांनी डॉक्टरवर तर दादागिरी केलीच परंतु सोबतच त्यांनी अख्ख्या क्लिनिकमध्येही (cat death news) रोजदार राडा केला. (Pune Cat News Doctor Assaulted after Cat Died During Treatment in Pune Maharashtra)

उपचारादरम्यान लाडक्या मांजराचा मृत्यू झाल्यानं क्लिनिकची तोडफोड करत डॉक्टरांना बेदम मारहाण करण्यात आली. उपचारासाठी आणलेल्या लाडक्या मांजराचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याने एका महिलेसह पाच जणांनी क्लिनिकची तोडफोड करत डॉक्टरला (doctor hitted) बेदम मारहाण केली. हडपसर परिसरातील डॉग अँड कॅट क्लिनिकमध्ये 10 डिसेंबरच्या रात्री हा प्रकार घडला. डॉ. रामनाथ येण्याबापू ढगे (वय 51) यांनी याप्रकरणी तक्रार दिली असून एका महिलेसह चार अनोळखी इसमांविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा - गावच्या शाळेत कॉमन टॉयलेट का?; खडा सवाल करत फॉरेन रिटर्न विद्यार्थिनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात

पाहा व्हिडीओ - 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की आरोपींनी फिर्यादी यांच्या भाजी मंडई जवळील डॉग अँड कॅट क्लिनिकमध्ये (dog and cat clinic) उपचारासाठी मांजराला आणले होते. यावेळी उपचार सुरू असताना मांजराचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी ''मांजर कसे झोपले, आता तुला झोपवतो, तुझा दवाखाना बंद करतो, अशी धमकी दिली. फिर्यादी यांना खाली पाडून लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी यांच्या उजव्या पायाच्या घोट्याला गंभीर दुखापत झाली आहे. आरोपींनी फिर्यादी यांच्या क्लिनिक मधील वस्तूंची देखील तोडफोड केली आहे. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.