Pune Crime : पुण्यात कोयता गँगला कोण पुरवतंय शस्त्र? पोलिसांची मोठी कारवाई Video Viral

Pune Crime : पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची (Koyta Gang) दहशत पाहिला मिळाली. हॉटेलमध्ये तोडफोड केल्यानंतर मोबाईल दुकानांची तोडफोड करतानाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. त्यानंतर पोलिसांनी कोयता गँगला शस्त्र पुरवणाऱ्या विक्रेत्यावर कारवाई केली आहे.

Updated: Jan 10, 2023, 02:50 PM IST
Pune Crime : पुण्यात कोयता गँगला कोण पुरवतंय शस्त्र? पोलिसांची मोठी कारवाई Video Viral title=
pune crime Koyta Gang CCTV video Who is supplying 105 weapons to Koyta Gang pune police action marathi news

Pune Koyta Gang CCTV :  पुण्यात पुन्हा एकदा दहशत निर्माण करणाऱ्या कोयता गँगची... पुण्यातील (Pune Crime) अनेक भागात दहशत निर्माण करणाऱ्या कोयता गँगने आता मोबाईल मार्केटमध्ये दुकानांची तोडफोड करत दहशत निर्माण केलीय. तापकीर गल्लीतील या मार्केटमध्ये 9 जानेवारीला संध्याकाळच्या सुमारास हातात कोयते घेऊन आलेल्या 4 जणांच्या या टोळक्याने दुकानांना टार्गेट केलं. तोडफोड करत हे टोळकं (Koyta Gang) इथून पळून गेलं. तोडफोडीची माहिती मिळताच पोलीस मार्केटमध्ये दाखल झाले होते. इथून हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन असताना ही घटना घडल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. 

यापूर्वी हॉटेलची तोडफोड 

पुणे शहरातील भवानी पेठेतील (Pune Bhawani Peth) निशा रेस्टॉरेन्टची कोयता गँगने (Nisha Restaurant) तोडफोड करण्यात आली. याबाबत लष्कर पोलीस स्टेशनमध्ये 6 अनोळखी व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी मोनिष म्हेत्रे यांनी तक्रार दाखल केली आहे. गुरुवारी 5 जानेवारीला दुपारी साडेतीनच्या सुमारास हॉटेलमध्ये गर्दी कमी होती. संतोष आणि अझीम नावाचे वेटर हॉटेलमध्ये काम करत होते. याचवेळी पाच ते सहा तरुण हॉटेलमध्ये घुसले. 

एवढे कोयते कशासाठी? 

कोयता गँगच्या मुसक्या आवळण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे. कोयता गँगला शस्त्र पुरवणाऱ्या विक्रेत्यावर पुणे पोलिसांनी कारवाई केलीय. या विक्रेत्याकडून 105 कोयते जप्त करण्यात आलेत.

पाहा - EXCLUSIVE VIDEO

हुसेन राजगारा असं दुकान मालकाचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केलीय. कारवाई करण्यात आलेलं दुकान रविवार पेठेतील बोहरी आळीमध्ये आहे. मध्य प्रदेशमधून हा व्यक्ती कोयते मागवत होता. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोयते घेऊन दहशत माजवण्याचे अनेक प्रकार समोर आले. महिनाभरात जवळपास 8 ते 10 घटना घडल्या होत्या. त्यानंतर पोलीस ऍक्शन मोडवर आले होते. (pune crime Koyta Gang CCTV video Who is supplying 105 weapons to Koyta Gang pune police action  marathi news)

 

हेसुद्धा वाचा - हिंदुंची हॉटेल चालवण्याची औकात आहे का? पुण्यात कोयता गँगकडून हॉटेलमध्ये तोडफोड, Video व्हायरल

 

पुण्यात गुंडांची दहशत

पुण्यात पोलिसांचा धाक नाही का, असा प्रश्न सर्वसामान्य विचारतं आहे. कारण या घटनेपूर्वी पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत सिंहगड लॉ कॉलेज परिसरात दोन युवकांनी हातात कोयते घेऊन दहशत निर्माण केली होती. यावेळी पोलिसांनी त्या तरुणांना अद्दल घडवली होती.