Pune Crime News : प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, असं म्हणतात. प्रेमाला कोणतंच बंधन नसतं, ना रंग, ना जात, ना धर्म... आपलं प्रेम मिळवण्यासाठी लोक कोणत्याही थराला जातात, अशी अनेक उदारहणं पहायला आणि ऐकायला मिळतात. मात्र, काही प्रेमाता अंत सुखकर असतो, तर काहींचा विदारक... अशीच एक घटना पुण्यातून आता समोर आली आहे. लोणी काळभोर (Loni Kalbhor) परिसरातील शिंदवणे घाटात (Shindawane Ghat) प्रियकराशी लग्न करण्यासाठी निघालेल्या ट्रक चालकाचा जीव गेल्याची संतापजनक घटना रविवारी घडली.
सर्वाकाही आनंदात असताना मृत्यूने सापळा रचला. रामेश्वर लक्ष्मण शिंदे असं या चालकाचं नाव असून तो त्याच्या जोडीदारासोबत प्रेमविवाहासाठी जात होता. मात्र, शिंदवणे घाटात जनावरांचा चारा घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्यानं रामेश्वरचा प्रेमीकासमोर अंत झाला. नव्या आयुष्याची स्वप्न बघणाऱ्या तरुणाचा एका चुकीमुळे सर्वकाही संपुष्टात (Pune Accident) आलं.
रामेश्वर शिंदे जोडीदारासोबत प्रेमविवाहासाठी रात्री साडेअकराच्या सुमारास लोणी काळभोर परिसरातील शिंदवणे घाटातून जनावरांचा चारा घेऊन उरळी कांचनकडे निघाले होते. दोघांना आधीच घरातून प्रेमविवाहासाठी विरोध झाला होता. आधीच विवाहित असलेली ही महिला पतीला सोडून आई-वडिलांच्या घरी राहत होती. त्यांच्या आंतरजातीय विवाहासाठी जात असताना काळाने घाला घातला. ट्रक लोणी काळभोरजवळील शिंदवणे घाटात येताच वळणाचा अंदाज न आल्याने ब्रेक फेल झाला आणि ट्रक जागेवरच पलटी झाला. यामध्ये ट्रकचालक रामेश्वर शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेली पायल शेख देखील अपघातात जखमी झाली आहे.
रामेश्वर शिंदे मुळचा परभणीचा आहे तर, प्रेमीका पायल शेख ही मूळची सांगलीची आहे. दोन दिवसांपूर्वी तिच्या नातेवाईकांनी ती हरवल्याची तक्रार मिरज पोलीस चौकीत दाखल केली होती. नव्या आयुष्याची सुरूवात करण्यासाठी पायल ही घर सोडून आली होती. अपघाताची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. शिंदे आणि त्या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे कोणतीही वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वीच शिंदे यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, पोलीस हवालदार तुकाराम पांढरे यांनी मंगळवारी शिंदेविरुद्ध भादंवि कलम २७९, ३०४ (अ), ३३८ आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. महिलेच्या पायाला झालेल्या दुखापतीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती उपनिरीक्षक विष्णू देशमुख यांनी दिली.
ENG
(96 ov) 364 (113 ov) 471
|
VS |
IND
00(0 ov) 465(100.4 ov)
|
Full Scorecard → |
VAN-W
|
VS |
SAM-W
|
Vanuatu Women beat Samoa Women by 9 runs | ||
Full Scorecard → |
SAM-W
|
VS |
PNG-W
|
Papua New Guinea Women beat Samoa Women by 4 wickets | ||
Full Scorecard → |
VAN-W
|
VS |
PNG-W
|
Papua New Guinea Women beat Vanuatu Women by 35 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.