सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेसोबत जवळीक साधू पाहणाऱ्या तरुणाला पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवला आहे. हा तरुण महिलेच्या एकटेपणाचा फायदा घ्यायचा आणि तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी करायचा. दरम्यान पीडित महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेच्या तक्रारीनंतर एका महिलेसह चार जणांवर विविध कलमांसह अॅट्रॉसिटी अक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिली होती. कोरेगाव पार्क येथील एका बार अँड रेस्टॉरंटमध्ये रविवारी दुपारी साडेचार ते पाच या दरम्यान हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे.
फिर्यादी महिला या कौटुंबिक कारणामुळे पतीपासून विभक्त राहत आहे. महिलेची आरोपी संतोष आणि त्याचा मित्र राहुल यांच्यासोबत ओळख होऊन मैत्री झाली होती. आरोपी संतोष याने महिलेच्या एकटेपणाचा गैरफायदा घेऊन तिच्यासोबत लगड करण्याचा प्रयत्न केला. तसेच महिलेसोबत अश्लील चाळे करुन शारीरिक संबंधाची मागणी केली. शारीरिक संबंध ठेवले नाही तर बदनामी करण्याची धमकी आरोपीने दिली. पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
पीडित महिलेने याबाबत आरोपी संतोष याच्या पत्नीला घडलेला प्रकार सांगितला. दरम्यान, फिर्यादी रविवारी दुपारी कोरेगाव पार्क येथील हॉटेलमध्ये मित्र मैत्रिणींसोबत पार्टी करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी संतोष याच्या पत्नीने हॉटेलमध्ये जाऊन फिर्यादी महिलेला जातिवाचक शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
याबाबत विश्रांतवाडी येथे राहणाऱ्या 25 वर्षाच्या महिलेने कोरेगाव पार्क पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संतोष वामनराव भरेकर आणि त्याची पत्नी, मित्र राहुल शिवाजी जाधव, एका अनोळखी व्यक्ती विरोधात आयपीसी 354, 323, 504, 506, 34, अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."
...Read More|
MI
(20 ov) 195/6
|
VS |
PBKS
198/3(16.3 ov)
|
| Punjab Kings beat Mumbai Indians by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
LSG
(20 ov) 146
|
VS |
RCB
149/5(15.1 ov)
|
| Royal Challengers Bengaluru beat Lucknow Super Giants by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
CSK
(20 ov) 192/5
|
VS |
KKR
160/7(20 ov)
|
| Chennai Super Kings beat Kolkata Knight Riders by 32 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.