पुणे : पुण्यातील गणेशोत्सवाचा शतकोत्तर रौप्य महोत्सव महापालिका देखील साजरा करत आहेत. त्या निमीत्त पाच हजार ढोलच्या वादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. मात्र, ध्वनिप्रदुषणामुळे हा कार्यक्रम महापालिकेला शहराबाहेर हलवावा लागलाय.
ढोल वादनाचा कार्यक्रम शहराबाहेर हलवण्याची नामुष्की बरोबरच बालेवाडीत हा कार्यक्रम घेण्यासाठी सात लाखांचे शुल्क देखील महापालिकेला मोजावे लागले आहे. २७ तारखेला हा कार्यक्रम होणार आहे.
या उत्सवानिमीत्त शाडूच्या गणेश मूर्ती बनवण्याचा भव्य उपक्रम देखील महापालिका घेणार आहे. तीन हजार विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. शतकोत्तर रौप्य महोत्सव म्हणजे महापालिकेच्या पैशाची उधळपट्टी आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे. त्या विरोधात सभागृहात आंदोलनं देखील केली.